Wednesday, March 25, 2026
spot_img
spot_img

भिगवणमधील तरुणी आईकडे परतणार? कोर्टात जबाब बदलला, अचानक नेमकं काय घडलं?

आजची सर्वात मोठी बातमी भिगवण मधून एक नजर महाराष्ट्र न्यूज वरती                                     भिगवण : भिगवणमधील तरुणीने कोर्टात जबाब बदलला आहे. तिने आईकडे परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

भिगवण प्रकरणात मोठा

भिगवणमधील तरुणीने जबाब बदललाअतिरिक्त सत्र न्यायालयात केली आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त

पुण्यातील भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. भिगवण प्रकरणातील तरुणीने कोर्टात तिचा जबाब बदलला आहे. बारामती पोलीस ठाणे आणि कोर्टात मुलासोबत राहायचं असल्याचे राहायचे असल्याचे म्हणालेल्या तरुणाने आता जबाब बदलला आहे. या तरुणीने आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

 

भिगवण प्रकरणात नवनवीन अपडेट हाती येत आहेत. भिगवन अपहरण प्रकरणातील तरुणी इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात पोहोचली. त्यावेळी तिने आई आणि मामाकडे जायची इच्छा व्यक्त केली आहे.

 

तरुणीने बारामती सत्र न्यायालयासमोर आईसोबत जाणार नसल्याचे म्हटली होती. तरुणीने जहीर शेखसोबत जाणार असल्याचे सांगितलं होते. या प्रकरणात आज इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीला व्हिडिओ कॉन्फेरन्सिंगद्वारे तरुणीला काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी तरुणीने आई आणि मामासोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली.

भिगवण प्रकरणातील तरुणी आधी तरुणासोबत राहण्यावर ठाम होती. तिने बारामतीमधील पोलीस ठाण्यात हजर केल्यानंतर कोर्टात हजर केलं होतं. त्यावेळी तिने जहीर शेखसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर तरुणीला सुधारगृहात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता या तरुणीने आज कोर्टात आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, तरुणी आईकडे कधी जाणार, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तरुणी

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या