Friday, March 27, 2026
spot_img
spot_img

राज्यातील वाईनचं भवितव्य धोक्यात? आयात शुल्काचे ओझे कमी झाल्याने परदेशी कंपन्या सुसाट, वाईन महासंघाची मोठी मागणी काय?

एक नजर महाराष्ट्र  न्युज                                      आजची बातमी शेतकऱ्यांसाठी                           एकीकडे तळीरामांसाठी परदेशी वाईन, शॅम्पेन वोडका स्वस्त होण्याची वार्ता येऊन धडकली असतानाच आता भारतीय वाईन उद्योगांवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. नाशिक येथील वाईन उद्योग यामुळे चिंतेत आहेत. भारतीय वाईन उद्योग महासंघाने याविषयी चिंता व्यक्त केली आहे.                                                      तळीरामांना आता स्वस्तात परदेशी वाईन, वोडका, शॅम्पेन मिळणार आहे. किंमती अर्ध्यावर येणार आहे. तर दुसरीकडे आयात शुल्क कमी झाल्याने बाहेरील वाईनचा महापूर येईल आणि स्थानिक वाईनकडे ग्राहक पाठ फिरवतील अशी भीती वाईन उत्पादकांना वाटत आहे. अखिल भारतीय वाईन उद्योग महासंघाने चिंता व्यक्त केली आहे.               भारत-अमेरिका दरम्यान वाईन आयात करारावर चर्चा केली. 150 टक्के आयात शुल्क युरोपीयन महासंघ, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि युके बरोबर 20 टक्क्यापर्यंत खाली आणले जाते. हे धोरण अमेरिके बरोबर वेगळे नसेल. भारतामध्ये न बनणाऱ्या प्रीमियम, अप्पर प्रीमियम वाईन, महागड्या वाईन स्वस्त झाल्या तर आम्हाला आनंदच आहे. असे अखिल भारतीय वाईन उद्योग महासंघाचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी प्रतिक्रिया दिली                                                 येथील द्राक्ष शेती, फळ शेती जगली पाहिजे. शेतकरी जगला पाहिजे. 5 ते 20 डॉलर पर्यंतच्या वाईन वरील आयात शुल्क कमी केले तर आम्हाला काही हरकत नाही. भारतामध्ये वाईन, स्पिरिटचा महापूर होणार असेल तर चुकीचे धोरण राहील. वाईनबाबत धोरण ठरवताना ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकर्‍यांचे विचार करणे गरजेचे आहे.         युरोपीयन महासंघ, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि युके यासह इंटरनॅशनल देशातील वाईनवरील सध्याचे 150 टक्के आयात शुल्क काही देशांसाठी 20 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा विचार सुरू असून अमेरिकेसोबतही तत्सम धोरण राहण्याची शक्यता असल्याने यामुळे वाईन उद्योजकांची डोकेदुखी वाढली आहेवाईन उद्योगाच्या विकासासोबतच स्थानिक शेतीचे संरक्षण करणारे संतुलित व सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी अखिल भारतीय वाईन उद्योग महासंघाचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी केली आहे. आयात शुल्काच्या निर्णयामुळे वाईन इंडस्ट्रीजला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या