तुम्ही पाहत आहात एक नजर महाराष्ट्र न्यूज बिझने शेतकरी कर्जमाफीचे निकष समोर; कोण पात्र, कोण अपात्र, समजून घ्या कर्जमाफीचे निकष समोर; कोण पात्र, कोण अपात्र, समजून घ्या
राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचे वातावरण आहे. तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. येत्या काही दिवसांत आपलं कर्जातून मुक्त होणार असल्याने शेतकरी वर्ग खुश आहे. मात्र सरकारने यासाठी काही निकष लावले आहेत. त्यामुळे जे शेतकरी कर्जमाफीच्या निकषात बसणार आहेत त्यांचंच कर्ज माफ होईल. त्यामुळे ब्लैराज सम्रभात आहे. अशावेळी शेतकऱ्याचं टेन्शन दुसरं करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला सर्व निकष आणि पात्रता तुम्हला सांगणार आहोत.
या योजनेत कर्जमुक्ती, ‘वन टाईम सेटलमेंट’ व प्रोत्साहनपर लाभ असे तीन घटक करण्यात आले आहेत.
१) ज्यांचे कर्ज दोन लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना दोन लाख रुपयांपर्यंत सर्व कर्जमाफ होईल.
२) दोन लाखांवरील थकबाकी 31 मार्च 2027 पूर्वी भरल्यास मुदत मिळणार. त्यांच्या खात्यातही दोन लाख रुपये शासन जमा करणार आहे
३) तर नियमित परतफेड करणाऱ्यांना पन्नास हजार रूपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळेल. महत्वाची बाब म्हणजे या योजनेत जमीन धारणेचा निकष नसेल.
कधीचे कर्ज माफ होणार?
1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत अल्पमुद्दत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत कर्ज माफ होणार
31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेली सर्व कर्जखात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याज
कोण पात्र नसणार?
१) या योजनेत राजकीय पदाधिकारी, सरकारी कर्मचारी व आयकर पात्र व्यक्ती पात्र नसणार
२) सहकारी संस्थांचे 25 हजार रुपयांहून अधिक वेतन असणारे अधिकारी, कर्मचारी पात्र नसणार
३) या आर्थिक वर्षात अल्प मुदत पीक कर्ज घेतल्यास परतफेड करणे अनिवार्य असेल.
वन टाईम सेटलमेंट काय आहे?
दोन लाखांपेक्षा जास्त असलेली थकीत रकमेची आधी परतफेड करावी लागणार.
‘वन टाईम सेटलमेंट’ म्हणून दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळेल.
दोन लाखांवरील रक्कम जमा करण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत प्रोत्साहनपर लाभ मिळेल.
पन्नास हजार रूपयांवरील थकबाकी जमा केल्यानंतर पन्नास हजार रुपये मिळणार
50 हजारांवरील जमा करण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंत मुदत आहे.
या आर्थिक वर्षात अल्प मुदत् पीक कर्ज घेतल्यास परतफेड करणे अनिवार्य आहे.
योजना कोणत्या बँकांना लागू ?
ही योजना राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून घेतलेल्या कर्जास लागू असेल.
या बँकांकडून शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणार
अँग्रीस्टॅक आधार सामग्री मंचावर शेतकऱ्यांची नोंदणी अनिवार्य असेल.
योजनेच्या कार्यान्वयनासाठी अद्ययावत पोर्टल विकसित करणार






