Wednesday, March 25, 2026
spot_img
spot_img

अजित पवारांच्या मृत्यूनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने VSR च्या विमानांबद्दल घेतला मोठा निर्णय

आजची सर्वात मोठी बातमी                                मुंबई 😐    दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मागच्या महिन्यात 28 जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने यापुढे VSR कंपनीचं विमान न वापरण्याचं ठरवलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार, नेते, मंत्री आणि स्वत: एकनाथ शिंदे यापुढे VSR कंपनीच्या विमानातून प्रवास करणार नाहीत. एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या आमदार, नेत्यांचा हा निर्णय मान्य केला आहे. मागच्या महिन्यात अजित पवार यांचा जो अपघाती मृत्यू झाला, ते विमान VSR कंपनीचं होतं. लेअर जेट प्रकारातील हे चार्टर्ड विमान होतं. केंद्र सरकारची संस्था DGCA कडून आता VSR च्या लेअर जेट विमानांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे.                                        रोहित पवार यांनी मागच्या काही दिवसात पत्रकार परिषदा घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल अनेक थिअरी मांडल्या आहेत. त्यामुळे आता अजित पवार यांच्या विमानाचा अपघात की घातपात? असा प्रश्न निर्माण झालाय. रोहित पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदांमधून VSR कंपनीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. विमानाच्या देखभालीपासून पायलटपर्यंत अनेक बाबतीत पितळं उघडं पाडलं आहे. रोहित पवारांनी जे मुद्दे मांडले, त्यावर निश्चित तपासण होणं गरजेच आहे, खासकरुन विमानांच्या देखभाली बद्दल.

VSR कंपनीकडून देशभरात चार्टर्ड विमानं भाड्यावर घेतली जातात. केंद्र सरकारची संस्था डीजीसीएने कारवाई म्हणून त्यांच्या लेअर जेट विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. आता डीजीसीए विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी रोहित पवार आंदोलन करत आहेत. रोहित पवा स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. पण तिथे गुन्हा दाखल करुन घेतला नाही. त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज बारामती पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या मांडला आहे. महाराष्ट्राने या विमान अपघातात आपला एक मोठा नेता गमावला आहे. अजित पवार यांच्यासारखं नेतृत्व तयार व्हायला बरीच वर्ष लागतात.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या