Monday, December 15, 2025
spot_img
spot_img

तिघे रात्री दारू पित बसले होते, शिवी दिली अन्… एकाचा जीवच गेला; बारामतीत काय घडलं?

एक नजर महाराष्ट्र न्यूज बारामती :       बारामतीमध्ये दारूच्या नशेत मित्रांनीच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवीगाळ करण्यावरून झालेल्या वादातून दोन मित्रांनी अविनाश लोंढे या तरुणाला दगडाने ठेचून मारले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे बारामती परिसरात खळबळ उडाली आहे.   मित्रच मित्राच्या जीवावर उठल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवी दिल्याच्या कारणावरून दोन मित्रांनी एका मित्राची हत्या केली. तिघेही रात्री दारू पित बसले होते. तिघांचं क्षुल्लक कारणावरून वाजलं अन् दोन मित्रांनी मिळून दुसऱ्या मित्राचा खून केला. या घटनेने बारामती हादरून गेली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.बारामतीत जुना मोरगाव रस्त्यावर ही घटना घडली. एका ठिकाणी अंधारात दारू पीत बसलेल्या तीन मित्रांना नशा चढली. त्यानंतर त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वादावादी सुरू झाली. एकमेकांना शिवीगाळ झाली. शिवीगाळ सुरू झाली आणि त्यातून वाद वाढला. शिव्या देतो म्हणून संतापलेल्या एकाने दगड उचलला. मग दोघांनी तिसऱ्या मित्राचा डोक्यात दगड घालून तो मरेपर्यंत दगडाने मारहाण केली. यानंतर भानावर आलेले दोघे आरोपी पोलीस ठाण्यात हजर झाले. या दोघांनीही गुन्हा कबूल केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

तिघे रात्री दारू पित बसले होते, शिवी दिली अन्… एकाचा जीवच गेला; बारामतीत काय घडलं?

बारामतीमध्ये दारूच्या नशेत मित्रांनीच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवीगाळ करण्यावरून झालेल्या वादातून दोन मित्रांनी अविनाश लोंढे या तरुणाला दगडाने ठेचून मारले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे बारामती परिसरात खळबळ उडाली आहे.

तिघे रात्री दारू पित बसले होते, शिवी दिली अन्… एकाचा जीवच गेला; बारामतीत काय घडलं?

मित्रच मित्राच्या जीवावर उठल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवी दिल्याच्या कारणावरून दोन मित्रांनी एका मित्राची हत्या केली. तिघेही रात्री दारू पित बसले होते. तिघांचं क्षुल्लक कारणावरून वाजलं अन् दोन मित्रांनी मिळून दुसऱ्या मित्राचा खून केला. या घटनेने बारामती हादरून गेली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

बारामतीत जुना मोरगाव रस्त्यावर ही घटना घडली. एका ठिकाणी अंधारात दारू पीत बसलेल्या तीन मित्रांना नशा चढली. त्यानंतर त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वादावादी सुरू झाली. एकमेकांना शिवीगाळ झाली. शिवीगाळ सुरू झाली आणि त्यातून वाद वाढला. शिव्या देतो म्हणून संतापलेल्या एकाने दगड उचलला. मग दोघांनी तिसऱ्या मित्राचा डोक्यात दगड घालून तो मरेपर्यंत दगडाने मारहाण केली. यानंतर भानावर आलेले दोघे आरोपी पोलीस ठाण्यात हजर झाले. या दोघांनीही गुन्हा कबूल केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

पोलीस घटनास्थळी धावले

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीत रात्री उशिरा ही घटना घडली. या घटनेत अविनाश उर्फ माऊली धनंजय लोंढे (वय 20 राहणार बारामती) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी समीर इक्बाल शेख (रा.देवळे इस्टेट, बारामती), आणि प्रथमेश राजेंद्र दळवी (रा.जगतापमळा, बारामती) या दोघांना अटक केली आहे. बेदम मारहाणीनंतर अविनाश लोंढे याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येतात दोन्ही आरोपींनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली आणि पोलीस ठाण्यात हजर होऊन त्यांनी पोलिसांना घटना सांगितली. पोलिसांनी तिथेच दोघांना ताब्यात घेतले आणि घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने परिसरात मात्र खळबळ उडाली आहे.

गुन्हे दाखल

मृत धनंजय लोंढे हा अत्यंत गरीब आहे. चहाची गाडी लावून तो त्याचा उदरनिर्वाह करत होता. आता घरचाच कर्ता गेल्याने लोंढे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आरोपी समीर इकबाल शेख हा चपल विक्रीच्या दुकानात काम करतो. तर प्रथमेश राजेंद्र दळवी हा येथील एका कंपनीत हेल्पर म्हणून काम करतो. या प्रकरणी अविनास लोंढे याच्या वडिलाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशन ठाण्यात 103(1),3 (5) अ.जा.ज.अ.प्र.का.क 3 (1) (r),3(2) (v) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या