एक नजर महाराष्ट्र न्यूज नातेपुते: गावातील रहिवाशांनुसार अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री अशा वस्तूंचे प्रमाण वाढते. मात्र सातत्याने अशा वस्तू दिसत असल्याने जादूटोण्यासारखे प्रकार नातेपुते सुरू असल्याचे पुढे येत आहे माळशिरस तालुक्यातील नातेपुते स्मशानभूमीत मध्यरात्रीच्या वेळी आघोरी प्रकार चालू असल्याचे निदर्शनास आले आहेत. जळत्या चितेच्या शेजारी काळ्या बाहुल्या, लिंबू सुया आणि काही व्यक्तींचे फोटो आढळून आले. त्यामुळे माळशिरस गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
नातेपुतेच्या वैकुंठ स्मशानभूमी काळया बाहुल्या नारळ सुया लिंबू दारूच्या बाटल्या आणि काही व्यक्तींचे फोटो, तसेच कवाळ, कोंबड्या अशा गोष्टी मध्यरात्रीच्या वेळी कुणीतरी ठेवल्याचे आढळून आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जळत्या चितेजवळ या गोष्टी ठेवल्या गेल्या. यामध्ये चितेमधील काही अवशेष देखील गायब असल्याचे गावकरी सांगत आहेत. संपूर्ण बातमी वाचा






