Sunday, December 14, 2025
spot_img
spot_img

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, छगन भुजबळ यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया

काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांच्या छाती दुखू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे. छगन भुजबळ यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.                                       एक नजर महाराष्ट्र न्युज मुंबई : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील फायरब्रँड नेते छगन भुजबळ यांच्याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भुजबळ गेल्या काही दिवसांपासून आजारपणाचा सामना करत होते. यानंतर त्यांच्यावर आता हृदय शस्त्रक्रिया पार पडल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ यांची गेल्या आठवड्यात प्रकृती खालावली होती. गेल्या आठवड्यात मंगळवारी मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीला छगन भुजबळ यांनी हजेरी लावली होती. तसेच मंत्रालयात पार पडलेल्या सर्व बैठकांमध्ये छगन भुजबळ उपस्थित होते.

छगन भुजबळ यांनी मंत्रालयातील बैठकांमध्ये काही महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या होत्या. पण मंत्रालयाचं कामकाज आटोपल्यानंतर छगन भुजबळ यांना थकवा जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. छगन भुजबळ यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर त्यांच्या कार्यालयाकडून छगन भुजबळ यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती देण्यात आली होती. पण त्यानंतर आज भुजबळ यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती समोर येत आहे.  विख्यात हृदयरोग तज्ज्ञाच्या हस्ते शस्त्रक्रिया

राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आज एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मुंबई येथे हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. विख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या शस्त्रक्रिये नंतर डॉक्टरांनी पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला छगन भुजबळ यांना दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी त्यांना पुढील काही दिवस कोणालाही भेटता येणार नाही, अशा सूचना डॉक्टरांनी दिल्या आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून ते लवकरच पूर्णपणे बरे होऊन आपल्या कार्यात पुन्हा सक्रिय होणार आहेत, अशी माहिती भुजबळ यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.

छगन भुजबळ यांची काही दिवसांपूर्वी अँजिओग्राफी करण्यात आली. त्या तपासणीअंती डॉक्टरांनी बायपास शस्रक्रिया करावी लागेल, असा सल्ला दिला होता. त्यानुसार सोमवारी ही शस्रक्रिया करण्यात आली आहे. पुढील किमान 15 दिवस भुजबळ आराम करणार असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे.

बीडमध्ये पुन्हा मुंडे विरुद्ध मुंडे लढत? महायुतीला तडा जाणार? पडद्यामागच्या घडामोडींनी  भुजबळ हे गेल्या काही दिवसांमध्ये ओबीसी मेळाव्यांमध्ये सहभागी झालेले बघायला मिळाले होते. त्यांचा मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटच्या नोंदनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध आहे. त्यामुळे त्यांनी ओबीसी मेळाव्यांमध्ये त्या विरोधात रोखठोक भूमिका मांडली. त्यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार टीका केली होती. तसेच ते मराठा आरक्षणाच्या नव्या कायद्या विरोधात कोर्टातही जाणार असल्याचं बोलत होते. या सर्व घडामोडींदरम्यान त्यांची प्रकृती बिघडली होती. आता त्यांची तब्येत बरी असल्याची माहिती आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या