एक नजर महाराष्ट्र न्यूज मुंबई : खासदार संजय राऊत हे ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते आहेत. पक्षाची भूमिका ते समर्थपणे मांडत असतात. कोणत्याही अडचणीच्या काळात संजय राऊत हे पक्षासाठी तसेच उद्धव ठाकरे यांच्यासाठी ढाल म्हणून उभे राहिलेले असतात. सध्या राऊत विरोधकाची भूमिका मोठ्या हिमतीने पार पाडत आहेत. मात्र सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आली आहे. संजय राऊत यांच्या प्रकृतीत गंभीर स्वरुपाचे बिघाड झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. या आजारावर मात करण्यासाठी त्यांना गर्दीत न जाण्याचा तसेच बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळेच पुढचे काही महिने त्यांना कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेता येणार नाही. खुद्द संजय राऊत यांनीच एक्स या समाजमाध्यमाद्वारे त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.राऊत यांनी नेमके काय सांगितले आहे?
संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. या पत्रात “आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले. पण शध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले आहे. माझ्यावर उपचार सुरू आहेत. मी यातून लवकरच बाहेर पडेन,” असे राऊत यांनी सांगितले आहे.
राऊत यांनी नेमके काय सांगितले आहे?
- संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. या पत्रात “आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले. पण शध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले आहे. माझ्यावर उपचार सुरू आहेत. मी यातून लवकरच बाहेर पडेन,” असे राऊत यांनी सांगितले आहे.






