कोल्ड्रीफ कफ सिरप बनवणाऱ्या श्रीसंत फार्मा कंपनीचे मालक रंगनाथन गोविंदन यांना अखेर अटक करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील एसआयटीने त्यांना चेन्नईमध्ये पहाटे अटक केली. रंगनाथन गोविंदन यांच्यावर पोलिसांनी 20 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. छिंदवाडाचे पोलीसअधीक्षक अजय पांडे यांनी या अटकेची माहिती दिली आहे. या घटनेमुळे औषध क्षेत्रातील गंभीर अनियमितता समोर आली आहे. केवळ कोल्ड्रीफच नाही, तर रेस्पि फ्रेश टीआर आणि री लाईफ या आणखी दोनऔषधांमध्येही विषारी घटक आढळले आहेत. ही दोन्ही औषधे गुजरात स्थित कंपन्यांची असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर, अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) तातडीने कार्यवाही करत सर्व औषध विक्रेत्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा घटनांवर प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जात आहे. या प्रकारामुळेऔषध कंपन्यांच्या गुणवत्ता नियंत्रणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रोज पहा एक नजर महाराष्ट्र न्यूज






