इंदापूर तालुक्यातील वीस हजार लाडक्या बहिणी झाल्या परक्या असा थेट आरोप (S.P.) गटाचे कार्यकर्त्यांनी केला मुख्य संपादक भीमसेन जाधव इंदापूर : तालुक्यातील वीस हजार लाडक्या बहिणी झाल्या परक्या याचा गंभीर आरोप शरदचंद्रजी पवार साहेब गटाचे आणि सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्हा अध्यक्ष सागर बाबा मिसाळ यांनी केला आहे. तसेच त्यांनी माझ्या या लाडक्या बहिणींना पुन्हा या योजनेत सामील करून त्यांना या योजनेपासून लांब ठेवू नये तसेच माझ्या या लाडक्या बहिणींना या योजनेची आतापर्यंत न मिळालेली हप्ते मिळावेत व त्यांना या योजनेचा लाभ मिळावा अशी त्यांनी कळकळीने व हात जोडून ताईंना विनंती केली आहे तसेच पाठीमागील महिन्यात जो पाऊस झाला तो जास्त प्रमाणात झाल्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा पाऊस झाल्यामुळे शेती वाहून गेली, घरात पाणी शिरल्यामुळे घराचे नुकसान, शेतकऱ्यांचे असणारी पिके, जनावरे वाहून गेली तसेच या जगाचा पोशिंदा म्हणजे आमचा शेतकरी हा भरडला गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी ही व्यथा शेतकऱ्यांनी तसेच शरचंद्र पवार गटाचे कार्यकर्त्यांनी ताईंकडे केली.






