एक नजर महाराष्ट्र न्यूज भिमसेन जाधव ओबीसी मेळाव्याच्या बॅनरवर फोटो नसल्याने लक्ष्मण हाके यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे ते ओबीसी चळवळीतून बाहेर पडण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. हाके यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, “मी मेंढपाळांचा मुलगा आहे, बॅनर छापू शकत नाही.” आज ते आंदोलनात राहतील की नाही, याबाबत आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे सांगितले आहे की, त्यांच्या एका सहकाऱ्यावर हल्ला झाला असूनही महाराष्ट्रातील नेते याकडे लक्ष देत नाहीत. त्यांना धमक्यांचे फोन येत आहेत आणि लोकेशन ट्रेस केले जात आहे. असे असतानाही त्यांचा गुन्हा फक्त ओबीसींच्या बाजूने उभे राहणे हा आहे. ओबीसी आरक्षण टिकले पाहिजे आणि जीआर रद्द झाला पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. आपलीच माणसे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत असल्याने त्यांना वाईट वाटत आहे, असेही त्यांनी नमूद केले आ






