एक नजर महाराष्ट्र मुख्य संपादक भीमसेन जाधव नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राच्या परिसरात काही गुंड अनधिकृतपणे गाड्यांच्या प्रवेशासाठी पावती वसूल करत होते. याच ठिकाणी काही पत्रकार साधू-महंतांच्या बैठकीच्या बातमीच्या वार्तांकनासाठी जात असताना काही गुंडांच्या टोळक्यांनी या पत्रकारांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत तीन ते चार पत्रकार जखमी झाले तर इलेक्ट्रॉनिक मीडिया पुढारीचे पत्रकार किरण ताजणे यांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर किरण ताजणे यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असल्याने पुरावे उपलब्ध आहेत. या घटनेमुळे पत्रकारांमध्ये संतापाची भावना आहे. पत्रकारांना मारहाण करण्याचा हा प्रकार अतिशय निंदनीय असून पत्रकार संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे आणि गुंडांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.






