इंदापूरच्या रोज ताज्या घडामोडी बातम्या व जाहिराती पाहण्यासाठी संपर्क मुख्य संपादक भीमसेन जाधव मोबाईल नंबर 91 12 13 16 16आज दिनांक ३० ऑगष्ट २०२५ रोजी इंदापूर येथे आंबेडकरी चळवळीतील इंदापूर तालुक्यातील प्रमुख पदाधिका ऱ्यांची बैठक इंदापूर विश्राम गृह येथे एनडीएमजे संघटनेचे सचिव वैभव गीते साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गीते साहेब यांनी इंदापूर तालुका हा चळवळीचा बालेकिल्ला असून या भूमित मस्तवाल जातीवादी अधिका-यांचे लाड खपवून घेतले जाणार नाहीत असे सांगितले
या बैठकीचे निमंत्रक अँड बापूसाहेब साबळे यांनी इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सूर्यकांत कोकणे यांची जातीयवादी भूमिका आणि चळवळीतील कार्यकर्ते संपवण्याचे षढयंत्र सर्वांनी मिळून हाणून पाडण्याचे आवाहन केले तसेच पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना राजकीय सामाजिक जिवनातून संपवण्याचे षढयंत्र रचनाऱ्या श्री कोकणे यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली श्री कोकणे इंदापूरात आल्या पासून वाढत असलेले बेकायदेशीर धंदे गुन्हेगारी या बाबत प्रमुख पदाधिकारी यांनी आपल्या भाषणात उहापोह केला
सदर बैठकीत पोलीस निरिक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या जातीयवादी भूमिकेचा निषेध करण्यात आला या वेळी तानाजी धोत्रे ‘ शिवाजीराव मखरे ‘ अॅड राहूल मखरे ‘ बाळासाहेब सरवदे ‘ नितीन झेंडे ‘अॅड कमलाकांत तोरणे ‘ अॅड पोळ ‘ एम बी लोंढे ‘ सूरज वनसाळे ‘ सुनिल साबळे ‘ निलेश खरात ‘ प्रमोद चव्हाण ‘ दत्तात्रय जगताप ‘ यांनी आक्रमकपणे आपले विचार मांडले
तसेच आजच इंदापूर विश्रामगृह येथे आलेले धर्मपाल मेश्राम महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष यांना इंदापूर पोलीस स्टेशनचे जातीयवादी पोलिस निरीक्षक श्री सूर्यकांत कोकणे यांच्या वादग्रस्त जातीवादी भूमिकेबद्दल निवेदन देण्यात
आले