एक नजर महाराष्ट्र पंढरपूर : फोंडशिरस जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या लहान मुलाला, रुद्रराज याला मतदान केंद्राच्या आत नेले. पंढरपूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत एक धक्कादायक आणि वादग्रस्त प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्यावर आपल्या लहान मुलाकडून मतदान करवून घेतल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.
सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात वर्चस्व असलेल्या मोहिते पाटील घराण्यातील सदस्याच्या एका कृतीमुळे पंढरपुरात मोठा वाद निर्माण झाला आहे. फोंडशिरस जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या लहान मुलाला, रुद्रराज याला मतदान केंद्राच्या आत नेले आणि त्यानंतर मुलानेच ईव्हीएम (EVM) मशीनचे बटण दाबल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.






