एक नजर महाराष्ट्र न्युज करेवाडी : येथे वंचित बहुजन युवा आघाडी शाखेचे जल्लोषात उद्घाटन करेवाडी (ता. इंदापूर | जि. पुणे)
वंचित बहुजन युवा आघाडी अंतर्गत “गाव तिथे शाखा” या उपक्रमाच्या माध्यमातून करेवाडी येथे शाखेचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले.
प्रकाश आंबेडकर (राष्ट्रीय अध्यक्ष – वंचित बहुजन आघाडी)
आणि
वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष डॉ. निलेश विश्वकर्मा महासचिव राजेंद्र पातोडे
यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सायंकाळी 6 वाजता पार पडलेल्या या उद्घाटन कार्यक्रमास इंदापूर तालुका, पंचक्रोशीतील युवक, कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाखा फलकाचे उद्घाटन युवक जिल्हाध्यक्ष मंगलदास भाऊ निकाळजे यांनी करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमात संघटन वाढ, युवकांचे प्रश्न, सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि गावपातळीवर वंचितांचे प्रश्न सोडवण्यासाठी शाखा महत्त्वाची भूमिका बजावेल असा निर्धार व्यक्त करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी युवकांनी संघटित होऊन अन्यायाविरुद्ध लढा देण्याचे आवाहन केले.
या वेळी नव्याने गठीत करण्यात आलेल्या शाखा कार्यकारिणीचा परिचय करून देण्यात आला तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करेवाडी शाखेतील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रम शांततेत व उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास वंचित बहुजन युवा आघाडीचे इंदापूर तालुका अध्यक्ष कीर्तीकुमार वाघमारे, महासचिव सोमनाथ खानेवाले, उपाध्यक्ष उमेश मोरे. सचिव प्रितम कांबळे. प्रसिद्धी प्रमुख. धीरज कांबळे जिल्हा सह सचिव कृष्णा साळुंके, अक्षय गायकवाड उपस्थित होते.
तसेच शाखा अध्यक्ष स्वप्निल गजधाने. उपाध्यक्ष परशुराम बुरांडे.सचिव. सुदर्शन सोनवणे. महासचिव. रोहन गजधाने. संघटक. सुरज पारवे. कार्याध्यक्ष महादेव घोडकम. संघटक अक्षय भोसले यांची नियुक्ती करण्यात आली.






