एक नजर महाराष्ट्र न्युज महाराष्ट्र : देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारी साजरी केली जाते. सावित्रीबाई फुले यांनी महिलांचे शिक्षण, समानता आणि सामाजिक सुधारणांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेतील भाषण स्पर्धेमध्ये सहभागी होणार असाल तर त्यांच्या योगदानाच्या आठवणींना नक्की उजाळा द्या. या लेखामध्ये तुमच्यासाठी भाषणाची काही उदाहरण दिली आहेत, त्या पद्धतीने तुम्ही भाषण तयार केले तर प्रमुख पाहुण्यांसह उपस्थिती मंडळीही टाळ्यांचा कडकडाट
आदरणीय प्रमुख पाहुणे, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो,
आज आपण थोर समाजसुधारिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत.
सावित्रीबाई या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला.
त्या काळात मुलींना शाळेत जाणे पाप मानले जात होते. पण सावित्रीबाईंनी सर्व अडथळ्यांवर मात केली.
समाजाने अपमान केल्यानंतरही त्या डगमगल्या नाहीत. ज्ञान हेच खरे शस्त्र आहे, हे त्यांनी दाखवून दिले.
त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या. विधवा विवाह, स्त्री स्वातंत्र्य यासाठी त्यांनी मोठा लढा दिला.
त्या केवळ शिक्षिका नव्हत्या, तर समाजक्रांतिकारक होत्या. सर्वांनी त्यांचा आदर्श घ्यावा.
शिक्षणाला कधीही कमी लेखू नये. सावित्रीबाईंचे विचार आजही मार्गदर्शक आहेत. माझा त्यांना मानाचा मुजरा! एक नजर महाराष्ट्र न्युज कडुन सावित्रीबाई फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! |






