एक नजर महाराष्ट्र न्युज बारामतीमध्ये रविवारी (28 डिसेंबर 2025) शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन AI चं उद्घाटन करण्यात आलं. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या पत्नी प्रिती अदानी हे होते.
राज्य आणि केंद्रीय राजकारणातही कायम चर्चेत असणारं बारामती या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. पवार साहेब आणि माझे 30 वर्षांपेक्षा जुने संबंध आहे. मी त्यांच्याकडून खूप शिकलो ते ज्ञानाच्याही पलीकडचं आहे. ते माझे मेंटॉर आहेत.”
“रात्रंदिवस काम करणारा आणि अतिशय साधा असणारा हा तरुण उद्योजक (गौतम अदानी) जमिनीवर पाय ठेवून आहे.”
दोन प्रसिद्ध व्यक्तींनी एकमेकांचं कौतुक करताना काढलेले हे उद्गार. या दोन व्यक्ती म्हणजे उद्योगपती गौतम अदानी आणि शरद पवार.
कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार कुटुंब एकत्र येणार हे या चर्चेचं कारण होतंच. पण गौतम अदानी आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी आणि संबंध यावरही या निमित्ताने पुन्हा चर्चा सुरू झाली.
पवार साहेब आणि माझे 30 वर्षांपेक्षा जुने संबंध आहे. मी त्यांच्याकडून खूप शिकलो ते ज्ञानाच्याही पलीकडचं आहे. ते माझे मेंटॉर आहेत.” पण, राहुल गांधींसह विरोधकांचा एक मोठा गट अदानी आणि सरकारच्या संबंधांवर प्रश्न उपस्थित करत असताना शरद पवार मात्र कशाचीही पर्वा न करता अगदी उघडपणे गौतम अदानींबरोबर घनिष्ठ संबंध असल्याचं अगदी अभिमानानं सांगतात. त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात अदानींची उपस्थिती असते.
एवढंच काय तर प्रचंड चर्चा झालेल्या ‘हिंडनबर्ग’ प्रकरणावेळीही विरोधक आक्रमकपणे टीका करत असताना शरद पवारांनी मात्र या प्रकरणी वेगळीच भूमिका मांडत या प्रकरणातील हवा काढून घेतल्याचं त्यावेळी विश्लेषकांनी म्हटलं होतं.
या निमित्ताने शरद पवार आणि गौतम अदानींचे संबंध कसे राहिले आहेत आणि ते कशाप्रकारे समोर आले आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. पण तत्पूर्वी रविवारच्या कार्यक्रमात अदानी आणि पवारांनी उधळलेली एकमेकांबाबतची स्तुतीसुमनं कशी होती? ते पाहूयात.
‘पवार साहेब माझे मेंटॉर’
या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने बारामतीमध्ये पवार कुटुंबही एकत्र जमल्याचं पाहायला मिळालं. संपूर्ण पवार कुटुंबानं गौतम अदानींच्या कुटुंबाचं मोठ्या उत्साहानं स्वागत केलं. दोन्ही कुटुंबांमध्ये असलेला जिव्हाळा दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न त्यातून दिसून आला.
या कार्यकमात बोलतानाही शरद पवारांनी गौतम अदानींचं तोंडभरून कौतुक केलं. गौतमभाई असा उल्लेख करत गौतम अदानींनी अगदी शून्यातून सुरुवात करत आज हे यश मिळवलं असल्याचं शरद पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं.
पवार म्हणाले, “काहीतरी करावं अशी गौतमभाईंची इच्छा होती. पण गुजरातमध्ये मर्यादा होत्या म्हणून ते मुंबईत आले. खिशात काहीही नव्हतं. पण मुंबई कष्ट करणाऱ्याला उपाशी ठेवत नाही आणि गौतमभाईंनी त्याचा फायदा घेतला.”
गौतम अदानींचा व्यवसाय 23 राज्यांत पसरला असल्याचा उल्लेख पवारांनी केली. त्यांनी लाखो हातांना काम दिलं आहे. त्यामुळं त्यांच्याकडून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी म्हणून त्यांना बोलावलं, असं शरद पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं.
“रात्रंदिवस काम करणारा आणि अतिशय साधा असणारा हा तरुण उद्योजक (गौतम अदानी) जमिनीवर पाय ठेवून आहे.”
दोन प्रसिद्ध व्यक्तींनी एकमेकांचं कौतुक करताना काढलेले हे उद्गार. या दोन व्यक्ती म्हणजे उद्योगपती गौतम अदानी आणि शरद पवार.






