Monday, December 15, 2025
spot_img
spot_img

आईसाठी… बापासाठी… पोरासाठी… मुलासाठी… आयटमसाठी… झाड लाव झाड लाव… सयाजी शिंदेंच्या ‘झाडखाऊ’ रॅपचा धुमाकूळ

  1. एक नजर महाराष्ट्र न्यूज अपडेट                   सध्या सोशल मीडियावर अभिनेते सयाजी शिंदे यांचे ‘झाडखाऊ’ हा रॅप धुमाकूळ घालत आहे. तुम्ही हे गाणे पाहिले का? नसेल पाहिले तर नक्की पाहा… गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी तोडल्या जाणाऱ्या झाडांना मोठा विरोध होत आहे. त्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी ठाम भूमिका घेतली होती. तसेच तपोवनासाठी तोडल्या गेलेल्या झाडांमुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड तापले आहे. आता या वादावर सयाजी शिंदे यांनी एक रॅप सॉंग तयार केले आहे. हे रॅप साँग सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. काय आहे हे रॅप साँग एकदा पाहा…सयाजी शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर नवे रॅप साँग शेअर केले आहे. या रॅप साँगचे नाव ‘झाडखाऊ’ आहे. या गाण्यात सयाजी शिंदे यांच्यासोबत गणेश आचार्य दिसत आहे. तसेच आईसाठी… बापासाठी… पोरासाठी… मुलासाठी… आयटमसाठी… झाड लाव झाड लाव असे या रॅप साँगचे बोल आहेत. सयाजी शिंदे यांनी स्वत: हे रॅप लिहिले आहे. या रॅप साँगला सयाजी शिंदे, गणेश आचार्य आणि शैलेंद्र यांनी आवाज दिला आहे. गाण्यामध्ये सयाजी शिंदे यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहेत. त्यांनी पांढऱ्या रंगची जिन्स, टी-शर्ट आणि त्यावर पांढरे जॅकेट घातले आहे. त्यासोबतच पांढऱ्या रंगाचे शूज देखील घातले आहेत. तसेच हे गाणे एका झाडाखाली देखील शूट केल्याचे दिसत आहे.सोशल मीडियावर सयाजी शिंदे यांचे हे रॅप साँग चांगलेच व्हायरल झाले आहे. नेटकऱ्यांनी या रॅप साँगवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. एका यूजरने खुप छान भाऊ तुम्ही आमच्यासाठी एक प्रेरणेची ज्योत आहेत आणि ती सदैव ह्या सृष्टीला तेजोमय करत रहावी हीच इच्छा अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने तुमच्या प्रयत्नांना सलाम सर, तुमच्या वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होण्यासाठी कुठे कसं कॉन्टॅक्ट करायचं याची माहिती सार्वजनिक केलीत तर लाखो तरुण मंडळी तुमच्या सोबत काम करायला इच्छुक आहेत असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने एकच नंबर सयाजी शिंदे असे म्हणत कमेंट केली आहे. इतर यूजरने देखील सयाजी शिंदे यांना कमेंट्स करत पाठिंबा दिला आहे.     

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या