एक नजर महाराष्ट्र न्यूज बारामती :बारामतीमध्ये दारूच्या नशेत मित्रांनीच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवीगाळ करण्यावरून झालेल्या वादातून दोन मित्रांनी अविनाश लोंढे या तरुणाला दगडाने ठेचून मारले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे बारामती परिसरात खळबळ उडाली आहे. मित्रच मित्राच्या जीवावर उठल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवी दिल्याच्या कारणावरून दोन मित्रांनी एका मित्राची हत्या केली. तिघेही रात्री दारू पित बसले होते. तिघांचं क्षुल्लक कारणावरून वाजलं अन् दोन मित्रांनी मिळून दुसऱ्या मित्राचा खून केला. या घटनेने बारामती हादरून गेली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. बारामतीत जुना मोरगाव रस्त्यावर ही घटना घडली. एका ठिकाणी अंधारात दारू पीत बसलेल्या तीन मित्रांना नशा चढली. त्यानंतर त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून वादावादी सुरू झाली. एकमेकांना शिवीगाळ झाली. शिवीगाळ सुरू झाली आणि त्यातून वाद वाढला. शिव्या देतो म्हणून संतापलेल्या एकाने दगड उचलला. मग दोघांनी तिसऱ्या मित्राचा डोक्यात दगड घालून तो मरेपर्यंत दगडाने मारहाण केली. यानंतर भानावर आलेले दोघे आरोपी पोलीस ठाण्यात हजर झाले. या दोघांनीही गुन्हा कबूल केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. रोज पहा एक नजर महाराष्ट्र न्यूज बातमी तुमची नजर आमची






