एक नजर ना महाराष्ट्र न्यूज मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये १८ वर्षांपर्यंत तरुण-तरुणी बेपत्ता होत असल्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जून ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुंबईतून ३७० हून अधिक तरुण-तरुणी बेपत्ता झाल्या. यात २६८ मुली आहेत. हा आकडा एकूण घटनांच्या ७२ टक्के आहे. सर्वसाधारणपणे दर महिन्याला ६० मुलं बेपत्ता होतात. अल्पवयीन मुलं गायब होणं ही बाब त्याच्या सुरक्षेसाठी गंभीर चिंता निर्माण करणारी आहे.
सीसीटीव्ही, मोबाइल ट्रॅकिंगच्या माध्यमातून तपास सुरू…
मुंबई पोलिसांच्या मिसिंग प्रकरणात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, अनेक प्रकरणात अल्पवयीन मुली मित्रांसोबत निघून जातात किंवा प्रेम प्रकरणात घर सोडून देतात. काही प्रकरणात मानवी तस्करीसह अन्य प्रकरणंही दिसून आली आहेत. ज्याचं गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल ट्रॅकिंग आणि स्थानिक माहितीच्या आधारे बेपत्ती मुलींचा तपास सुरू आहे. मात्र दर महिन्याला नव्या तक्रारींमध्ये होणारी वाढ विभागाची चिंता वाढवणारी आहे, नवभारत टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
6 वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण; प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला, निर्भयासारखी क्रूरता
नक्की वाचा – एक नजर महाराष्ट्र न्यूज वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण; प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकला, निर्भयासारखी क्रूरता
घर, कुटुंब आणि समाजाची जबाबदारी…
६०० हून अधिक बेपत्ता मुली शोधण्याचा रेकॉर्ड केलेल्या मुंबई पोलिसांचे कर्मचारी राजेश पांडे यांनी सांगितलं, आई-वडिलांशिवाय कुटुंबातील सदस्य आणि शाळा व्यवस्थापकांना मुला-मुलींमधील वागणुकीत बदल, सोशल मीडियावरील हालचालींवर लक्ष ठेवून आहे. पालकांनी मुली अचानक गायब झाल्या तर विलंब न करता पोलीस तक्रार दाखल करावी. ही आपली जबाबदारी आहे.
जून ते 6 डिसेंबरपर्यंत
एकूण बेपत्ता : 370+
मुली: 268+ (72%)
सर्नाधिक बेपत्ता प्रकरण: नोव्हेंबरमध्ये (71)
प्रति महिना मिसिंग केस: 55 से 60
हरवलेल्या मुलाची तक्रार कुठे करावी?
– मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला १०० आणि ११२ वर कॉल करा.
– चाइल्डलाइन एनजीओला कॉल करून (अल्पवयीन मुलाच्या बाबतीत)
– १०९८ वर कॉल करा.
– जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करा
– ‘ट्रॅक द मिसिंग चाइल्ड’ पोर्टलवर ऑनलाइन (trackthemissingchild.gov.in) नोंद करा
महिन्यांनुसार बेपत्ता मुलं-मुलींची आकडेवारी
जून – ७० (अल्पवयीन – ५६ )
जुलै – ५९ (३७)
ऑगस्ट – ५१ (३७)
सप्टेंबर – ५१ (३७)
ऑक्टोबर – ५७ (४१)
नोव्हेंबर – ७१ (५२)
डिसेंबर (६ तारखेपर्यंत) – ११ (८)






