Thursday, December 11, 2025
spot_img
spot_img

वाल्मिक कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, धनंजय मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल

 

Ek Najar Maharashtra news        परळीतून धनंजय मुंडेंच्या समर्थकांची एक धक्कादायक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये क्रूर हत्येचा मुख्य आरोपी वाल्मिक कराड लवकरच जामिनावर बाहेर येणार असल्याचे दावे करण्यात आले आहेत. परळीतील धनंजय मुंडे समर्थक आणि नगराध्यक्ष उमेदवाराचे पती बाजीराव धर्माधिकारी यांचे हे बोल असल्याचे म्हटले जात आहे. या क्लिपमध्ये, वाल्मिक कराडला जामीन मिळणार असल्याने लोकांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा देण्याचे आवाहन धमकीवजा पद्धतीने करण्यात येत आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आणि सरकार तसेच सरकारी वकील कोणताही दोषी सुटणार नसल्याचे सांगत असताना, कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारची खात्रीशीर विधाने केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या घटनेमुळे परळीतील राजकीय वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. मराठा नेते मनोजजरांगे यांनी या क्लिपवर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली असून, जर कराडला न्यायालयाने दोषी ठरवले तर त्याचे कुटुंब धनंजय मुंडेंचे अनेक कारनामे बाहेर काढू शकते, अशी शक्यता वर्तवली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या