एक नजर महाराष्ट्र न्युज मुख्य संपादक भीमसेन जाधव मी शब्दाचा पक्का…थातुरमातुर काही…. बारामतीपेक्षा इतर नेत्यांची शहरं भिकारxxx अन्.. दादा काय म्हण
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अंबाजोगाई येथील सभेत स्वतःच्या कार्यशैलीचे समर्थन करताना महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले, “मी थातुरमातुर सांगत नाही, शब्दाचा पक्का आहे.” बारामतीसारख्या स्वतःच्या मतदारसंघातील विकासाचा दाखला देत, त्यांनी इतर नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. विकासाच्या गप्पा मारणारे अनेक नेते असतात, पण त्यांची स्वतःची शहरेच भकास आणि बकाल असतात, असे निरीक्षण पवारांनी नोंदवले.
दुसरीकडे राज्यात विविध राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे काहींना पचलं नाही, असे शिंदे म्हणाले. एका सामान्य कुटुंबातून शाखाप्रमुख ते मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास काही लोकांना अजूनही सहन होत नसल्याचे ते म्हणाले. त्यांची पोटदुखी, जळजळ आणि मळमळ सुरूच असल्याची उपरोधिक टीका करत, शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा उल्लेख केला.






