बारामती एक नजर महाराष्ट्र न्यूज बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बारामती येथील माळेगावमधील एका प्रचारसभेत मतदारांना उद्देशून मोठे आणि वादग्रस्त विधान केले आहे. “मत द्यायचं तुमच्या हातात आहे आणि निधी द्यायचं माझ्या हातात आहे. उमेदवारांना निवडून दिलं नाही तर मी निधीमध्ये कट मारणार,” असे त्यांनी म्हटले. अजित पवार यांनी आपण जिल्ह्याचे पालकमंत्री असून, आपल्याकडे १४०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असल्याचे सांगितले. जर मतदारांनी सर्व १८ उमेदवार निवडून दिले, तर सांगितलेली सर्व कामे पूर्ण करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. मात्र, मतदारांनी सहकार्य न केल्यास आपणही निधी रोखणार, अशी अप्रत्यक्ष धमकी त्यांनी दिली. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.






