Saturday, December 13, 2025
spot_img
spot_img

मंगलदास निकाळजे यांचा प्रभाग क्र.14 ब मधून उमेदवारी अर्ज दाखल

बारामती : एक नजर महाराष्ट्र न्युज

बारामती नगरपरिषद सार्वजनिक निवडणूक 2025 साठी प्रभाग क्र.14 ब मधून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मंगलदास तुकाराम निकाळजे यांनी मोठ्या उत्साहात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

 

अर्ज दाखल करताना निकाळजे यांच्या सोबत नामांकन रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते, महिला बांधव तसेच नागरिक उपस्थित होते. कार्यालयात दाखल केलेल्या अर्ज प्रक्रियेवेळी शिस्तबद्ध आणि लोकशाही पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया पार पडली.

 

मंगलदास निकाळजे यांनी यावेळी बोलताना सांगितले की,

“हा उमेदवारी अर्ज फक्त माझा नाही, तर प्रभागातील प्रत्येक नागरिकाचा विश्वास आहे. रस्ते, पाणी, ड्रेनेज, पथदिवे, वतनी जमिनीचा प्रश्न, पथविक्रेते, महिलांचे प्रश्न, युवकांसाठी संधी — हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”

 

निकाळजे यांनी प्रभागातील नागरिकांना आवाहन करत पुढे म्हटले,

“आपल्या मतांनी मला साथ द्या, मी तुमचा आवाज शक्तीपूर्वक नगरपरिषदेत मांडेन. प्रभाग 14 ब ला आदर्श प्रभाग बनवणे हा माझा निर्धार आहे.”

 

कार्यकर्त्यांमधील उत्साह, जनतेचा वाढता प्रतिसाद आणि पारदर्शक काम करण्याची प्रतिमा लक्षात घेता, निकाळजे यांच्या उमेदवारीला प्रभागात चांगला पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.                                                   लवकरच आपली बातमी एक नजर महाराष्ट्र न्युजवर पाठवा

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या