Sunday, December 14, 2025
spot_img
spot_img

पुण्याच्या नवले पुलावर भीषण अपघात, दोन ट्रक अन् कारच्या अपघातात 7 जणांचा मृत्यू

मोठी बातमी समोर येत आहे, पुण्यातील नवले पुलावर दोन ट्रक आणि एका कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर ट्रकला आग लागल्याची घटना घडली, या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे.                              एक नजर महाराष्ट्र न्यूज पुणे नवले ब्रिज                पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे, पुण्याच्या नवले पुलावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर दोन ट्रकला आग लागली असून, या दोन ट्रकच्यामध्ये एक कार अडकली आहे. या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार नवले पुलावर दोन ट्रकची समोरा समोर धडकी झाली, त्यानंतर या दोन ट्रकच्यामध्ये एक कार अडकल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर दोन्ही ट्रकने पेट घेतला आहे. साताऱ्याच्या दिशेकडून पुण्याकडे येणाऱ्या दोन ट्रकचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन ट्रकच्यामध्ये एक चारचाकी वाहन अडकल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातानंतर या दोन्ही ट्रकला आग लागली, या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या आणखी वाढू शकते, अशी भीती व्यक्त केली जात                दरम्यान दोन ट्रक आणि एका कारचा अपघात झाल्यामुळे हा रस्ता आता वाहतुकीसाठी बंद झाला आहे, त्यामुळे या परिसरात प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे, वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हात सुरू आहेत. या अपघातामध्ये तीनही वाहनांचं प्रचंड नुकसान झालं आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. मात्र अजूनही ही कार या दोन्ही ट्रकच्यामध्ये अडकलेलीच आहे, तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न आता अग्निशमन दल आणि पुणे पोलिसांकडून सुरू आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या