Sunday, December 14, 2025
spot_img
spot_img

बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड ! ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

एक नजर महाराष्ट्र न्यूज मुंबई:                  बॉलिवूडचे ‘हि-मॅन’ अर्थात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं आज निधन झालं. वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.धर्मेंद्र यांच्या निधनानं बॉलिवूडवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी , आणि मुलं, नातवंड असा गोतावळा आहे.              धर्मेंद्र यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यामुळं त्यांना मुंबईतल्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयू विभागत उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती आणखी खालावत गेली,त्यांना श्वासोच्छवासाचाही त्रास जाणवत होता. त्यामुळं त्यांना लाइफ सपोर्टवर म्हणजेच व्हेंटिलेटवर शिफ्ट करण्यात आलं होतं. काल सायंकाळपासून त्यांचे कुटुंबिय, मित्रमंडळी रुग्णालयात भेटीसाठी येत होते. अभिनेता शाहरुख खान, सलमान खान देखील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये भेटीसाठी आल्याचं पाहायला मिळालं होतं. धर्मेंद्र यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यामुळं त्यांना मुंबईतल्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयू विभागत उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती आणखी खालावत गेली,त्यांना श्वासोच्छवासाचाही त्रास जाणवत होता. त्यामुळं त्यांना लाइफ सपोर्टवर म्हणजेच व्हेंटिलेटवर शिफ्ट करण्यात आलं होतं. काल सायंकाळपासून त्यांचे कुटुंबिय, मित्रमंडळी रुग्णालयात भेटीसाठी येत होते. अभिनेता शाहरुख खान, सलमान खान देखील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये भेटीसाठी आल्याचं पाहायला मिळालं होतं.

शेवटच्या क्षणी संपूर्ण कुटुंबिय होतं सोबत

धर्मेंद्र यांच्या शेवटच्या क्षणी त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या सोबत होतं.

धर्मेंद्र यांच्याबद्दल …

धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 मध्ये पंजाबमधल्या कपूरथला जिल्ह्यात झाला होता. त्यांचं शिक्षण फगवाडा इथल्या आर्य हायस्कूलमध्ये झालं. धर्मेंद्रंचं शिक्षण हे मॅट्रिकपर्यंत झालं होतं. त्यानंतर ते रेल्वेमध्ये क्लर्क म्हणून नोकरीलाही लागले. पण सिनेमाची,अभिनयाची आवड असल्यानं त्यांनी ती नोकरी सोडली. त्यांनी फिल्मफेअरच्या स्पर्धेत भाग घेतला अन् त्यानंतर त्यांचं आयुष्य बदललं                                        अर्जुन हिंगोरानी यांनी धर्मेंद्र यांना सिनेमासाठी पसंत केलं. हिंगोरानी यांनी ‘दिल भी तेरा हम भी तेरे’साठी अवघ्या 51 रुपयांमध्ये त्यांना साइन केले होतं. त्यानंतर ‘सत्यकाम’,’शोले’ , ‘चुपके-चुपके’,बंदिनी, ‘फूल और पत्थर’सूरत और सीरत असे अनेक सिनेमे त्यांचे गाजले.

धर्मेंद्र यांच्या कामाबद्दल सांगायचं तर नुकतंच त्यांनी शाहिद कपूर आणि क्रिती सेननच्या ‘तेरी बातो में ऐसा उल्झा जिया’ मध्ये काम केलं होतं. ते आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्येही दिसले होते.        आजचा दिवस काळाचा एक नजर महाराष्ट्र न्यूज कडून भावपूर्ण श्रद्धांजली

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या