मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने केलेल्या वादग्रस्त जमीन प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. संबंधित जमीन व्यवहार रद्द करण्यात आल्याची माहिती अजित पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल का झाला नाही? याचं उत्तर दिलं आहे. या प्रकरणातील जे डॉक्यमेंट झाले होते ते सर्व कॅन्सल करण्यात आल्याचं अजित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या निमित्ताने आढावा बैठका घेतल्या होत्या. त्यावेळेस मी आढावा बैठका संपल्यानंतर गेल्या दोन दिवसांपूर्वी ज्या चर्चा सुरु आहेत त्याची पूर्ण माहिती घेऊन त्यावर बोलेन आणि माझी भूमिका स्पष्ट करेन”, असं अजित पवार सुरुवातीला म्हणाले. जमीन गैरव्यवहार प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला. पण पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. यामुळे अजित पवार यांच्यावर टीका होत आहे. अखेर अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत याबाबत सविस्तर भूमिका मांडली. मी आजपर्यंतच्या माझ्या 35 वर्षांच्या राजकीय जीवनात कधी नियम सोडून काम केलेलं नाही. मागे माझ्यावर 2009-2010 मध्ये आरोप झाले. पण त्याचे कुठेही पुरावे निघाले नाहीत. त्याचे श्वेतपत्रिका निघाले आहेत. पण मधूनआधून त्यावरुन कमेंट करुन मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो”, असं अजित पवार म्हणाले
जमीन गैरव्यवहार प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला. पण पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. यामुळे अजित पवार यांच्यावर टीका होत आहे. अखेर अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत याबाबत सविस्तर भूमिका मांडली.
: उपमुख् यांनी आज पत्रकार परिषद घेत पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने केलेल्या वादग्रस्त जमीन प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. संबंधित जमीन व्यवहार रद्द करण्यात आल्याची माहिती अजित पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल का झाला नाही? याचं उत्तर दिलं आहे. या प्रकरणातील जे डॉक्यमेंट झाले होते ते सर्व कॅन्सल करण्यात आल्याचं अजित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या निमित्ताने आढावा बैठका घेतल्या होत्या. त्यावेळेस मी आढावा बैठका संपल्यानंतर गेल्या दोन दिवसांपूर्वी ज्या चर्चा सुरु आहेत त्याची पूर्ण माहिती घेऊन त्यावर बोलेन आणि माझी भूमिका स्पष्ट करेन”, असं अजित पवार सुरुवातीला म्हणाले.
माझ्या 35 वर्षांच्या राजकीय जीवनात कधी नियम सोडून काम केलेलं नाही. मागे माझ्यावर 2009-2010 मध्ये आरोप झाले. पण त्याचे कुठेही पुरावे निघाले नाहीत. त्याचे श्वेतपत्रिका निघाले आहेत. पण मधूनआधून त्यावरुन कमेंट करुन मला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो”, असं अजित पवार म्हणाले.
“या व्यवहारात एक रुपया देखील दिला गेला नाही. सर्व डॉक्यूमेंट्स कॅन्सल करण्यात आलेला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती एक महिन्यात चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांनी पारदर्शकपणे काम करावं. राज्याच्या प्रमुखांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. स्वच्छ अधिकारी तपास करत आहेत. मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्याने माझ्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना करायच्या आहेत. इथून पुढे कुठेही माझं नाव घेऊन एखादं प्रकरण आलं आणि नियमाच्या बाहेर आलं तर अजिबात दबावात येऊन काम करु नये”, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. मीडियाला या गोष्टी मिळाल्या. ते मीडियाचं कामच आहे. पण त्यामध्ये अजून इतर बाबी आल्या. माझं म्हणणं आहे चुकीच्या गोष्टी झाल्या असतील त्या सगळ्यांची चौकशी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी. मागच्या काळात कुठेही व्यवहार झाल्या असतील तर चौकशी करावी. मी अनियमित असा कोणताही व्यवहार करणार नाही”, असं अजित पवार म्हणाले.
यामध्ये एकही पैशाचा व्यवहार झालेला नाही. तरीही रजिस्ट्रेशन कसं झालं, हा तपासाचा भाग आहे. या प्रकरणात दोन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस पोलिसांचं काम करणार आहेत. यामध्ये राजकीय हस्तक्षेप कुणी करणार नाही. या प्रकरणात सर्व माहिती समोर यायला हवी. कुणी कुणाची फसवणूक केली, कुणी सांगितल्यामुळे हे घडलं, कुणाचे फोन गेले, कुणी दबाव आणला होता, या सगळ्या गोष्टी चौकशी समितीच्या तपासात समोर येतील”, असं ते म्हणाले.मला हा व्यवहार झालेला माहिती नव्हता. ज्यावेळेस कुणी चर्चा करतं तेव्ही मी सांगतो की, नियमाप्रमाणे करा. नियमाच्या बाहेर केलेलं मला चालत नाही. मी माझ्या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांना विचारलं की, उपमुख्यमंत्री कार्यालयातून कुणी फोन करुन अधिकाऱ्यांवर दबाव टाकला का? ते नाही म्हणाले. रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्यात आलं आहे. त्याचे काय कागदपत्रे दिले ते माहिती नाही. तिथे नोंदणी कार्यालयात जावून हे रद्द करण्याबाबतच्या घडामोडी झाल्याची माहिती मिळाली आहे”, असं अजित पवारांनी सांगितलं.






