सुषमा अंधारे उद्या फलटण पोलीस स्टेशनला जाणार अन्… एसआयटी प्रमुख नियुक्तीवर
एक नजर महाराष्ट्र न्युज फलटण : ठाकरे गटाचे नेते सुषमा अंधारे उद्या सकाळी 10:30 वाजता फलटण पोलीस स्थानकाला भेट देणार आहेत. फलटण येथील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी त्या पोलिसांशी चर्चा करतील. या प्रकरणाच्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) प्रमुखपदी पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नियुक्तीवर सुषमा अंधारे यांनी आक्मा अंधारे उद्या फलटण पोलीस स्टेशनला जाणार अन्… एसआयटी प्रमुख नियुक्तीवर अंधारे यांनी आक्षेप घेतला आहे.सुषमा अंधारे यांच्या म्हणण्यानुसार, त्या काही कायदेशीर मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यासाठी आणि संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी फलटणमध्ये जात आहेत. हा लढा कोणत्याही पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका माणसासाठी दिलेला आहे. यागरिकांनी सहभागी व्हावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. हा तपास निष्पक्षपणे व्हावा आणि पीडितेला न्याय मिळावा, अशी त्यांची मागणी आहे.






