Sunday, December 14, 2025
spot_img
spot_img

छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचितचा संघ कार्यालयावर मोर्चा, नोंदणी अभियानावरून वाद चिघळला

एक नजर महाराष्ट्र न्यूज भीमसेन जाधव                          छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढून भाजप आणि संघाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काही दिवसांपूर्वी शहरातील एका महाविद्यालयाबाहेर संघाने नोंदणी अभियान सुरू केले होते. या अभियानाला वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. याच पार्श्वभूमीवर वंचित आघाडीने हा मोर्चा काढला. पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचे कारण देत परवानगी नाकारली होती, मात्र वंचित आपल्या भूमिकेवर ठाम राहिली. यावेळी वंचित आघाडीने संघाच्या नोंदणीच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

 

“तुमचा धार्मिक अजेंडा आहे का?”, असा सवाल करत त्यांनी अशा उपक्रमांवर त्वरित बंदी घालण्याची मागणी केली. शैक्षणिक संस्थांचा उद्देश वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे हा असतो, धर्माचा प्रचार करणे नव्हे, असेही वंचितच्या नेत्यांनी स्पष्ट केले. संघाची नोंदणी आहे का आणि तुम्ही भारत सरकारकडे नोंदणीकृत आहात का, हे जनतेला खुलेआम सांगा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या घटनेमुळे संघ आणि वंचित आघाडी यांच्यातील वाद अधिकच चिघळले आहेत.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या