Monday, October 27, 2025
spot_img
spot_img

कर्जत जामखेडमध्ये ट्रम्प तात्याचं बोगस आधारकार्ड! रोहित पवारांनी थेट Live चं दाखवलं, सत्ताधारी आमदारही म्हणताय 1 लाख बोगस मतदार

प्रतिनिधी एक नजर महाराष्ट्र न्यूज भीमसेन जाधव               कर्जत जामखेडमध्ये ट्रम्प तात्याचं बोगस आधारकार्ड! रोहित पवारांनी थेट Live चं दाखवलं, सत्ताधारी आमदारही म्हणताय 1 लाख बोगस मतदार एक लाख बोगस मतदार असल्याचा खळबळजनक दावा सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले असून, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गायकवाडयांच्या मते, बुलढाणा शहरात 5 हजार, तर संपूर्ण जिल्ह्यात सुमारे 1 लाख बोगस नावे मतदार यादीत आहेत. अनेक मृत व्यक्तींची नावे अजूनही यादीत असून, नगरसेवकांनी निवडून येण्यासाठी गेल्या पाच-दहा वर्षांत जिल्ह्याबाहेरूनही नावे टाकली असल्याचा आरोपत्यांनी केला आहे.                        दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी बनावट मतदार नोंदणी कशी होते, याचा पर्दाफाश केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे बनावट आधार कार्ड ऑनलाइन कसे बनवता येते, हे त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवले. बोगस आधार कार्डच्या आधारे मतदार नोंदणी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. रोहित पवार यांनी भाजपचे पदाधिकारी देवांग दवे यांच्यावरही निवडणूक आयोगाच्या वेबसाइटच्या कामात हस्तक्षेप करून नावे टाकणे आणि डिलीट करण्याचे आरोप केले, जे दवे यांनी फेटाळले आहेत. हे आरोप निवडणूक प्रक्रियेतील गंभीर त्रुटींकडे

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या