Monday, October 27, 2025
spot_img
spot_img

बिल्डरांच्या डंपर्सना कोणाचा आशीर्वाद? अपघातात 5 पुणेकर महिलांचा जीव गेला तरी सारे नेते चिडीचूप

मुख्य संपादक भीमसेन जाधव          पुणे:   पुण्यात डंपर आणि सिमेंट मिक्सरच्या बेदरकार वाहतुकीने पाच जणांचा बळी घेतला आहे, तरीही राजकीय नेत्यांकडून यावर कोणतेही ठोस विधान किंवा कारवाई होताना दिसत नाही. डझनभर आमदार आणि अनेक मंत्री असूनही, पुण्यातून एकाही नेत्याने या गंभीर समस्येवर आवाज उठवलेला नाही. रहदारीच्या वेळी डंपर वाहतुकीवर बंदी असतानाही पिंपरी चिंचवड आणि हिंजवडीत ही वाहने बिनदिक्कतपणे धावत आहेत.

गेल्या दहा महिन्यांत या अपघातांमुळे पाच महिला पुणेकरांनी आपले जीव गमावले आहेत. अनेक डंपर आणि सिमेंट मिक्सर बिल्डर आणि नेत्यांशी संबंधित असल्याने त्यांच्यावर कडक कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दुर्घटनेनंतर तात्पुरती कारवाई होते आणि नंतर परिस्थिती ‘जैसे थे’ होते. यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.                           रोज पहा एक नजर महाराष्ट्र न्यूज

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या