एक नजर महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक भीमसेन जाधव मुंबई: कोल्ड्रिफ कफ सिरपवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली असून, या औषधाची विक्री, उत्पादन आणि वितरण थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये या सिरपच्या सेवनामुळे 18 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्ड्रिफ सिरपमध्येसेवनामुळे 18 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्ड्रिफ सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल नावाचा विषारी घटक आढळून आला आहे, जो वाहनांच्या ब्रेक
कोल्ड्रिफ कफ सिरपवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली असून, या औषधाची विक्री, उत्पादन आणि वितरण थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये या सिरपच्या सेवनामुळे 18 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्ड्रिफ सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल नावाचा विषारी घटक आढळून आला आहे, जो वाहनांच्या ब्रेक ऑइलमध्ये वापरला जातो. या घटकामुळे बालकांची किडनी निकामी होऊन त्यांचे प्राण गेले.
राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने याबाबत एक टोल फ्री क्रमांक 1800 222 365) जारी केला आहे. मेडिकल दुकानांमध्ये एप्रिल 2017 ते मे 2025 या कालावधीतील कोल्ड्रिफ सिरपचा साठा आढळल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, औषध निरीक्षकांना असा साठा गोठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारनेही या घटनेनंतर सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांची बैठक बोलावून बालकांना खोकल्याची औषधे सावधगिरीने देण्याचे निर्देश दिले आहेत. दोन वर्षांखालील मुलांना खोकल्याचे औषध अजिबात न देण्याचा आणि पाच वर्षांखालील मुलांना डॉक्टरांच्या शिफारशीशिवाय औषध न देण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहेवाहनांच्या ब्रेक ऑइलमध्ये वापरला जातो. या घटकामुळे बालकांची किडनी निकामी होऊन त्यांचे प्राण गेले.केंद्र सरकारनेही या घटनेनंतर सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांची बैठक बोलावून बालकांना खोकल्याची औषधे सावधगिरीने देण्याचे निर्देश दिले आहेत. दोन वर्षांखालील मुलांना खोकल्याचे औषध अजिबात न देण्याचा आणि पाच वर्षांखालील मुलांना डॉक्टरांच्या शिफारशीशिवाय औषध न देण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.






