Monday, October 27, 2025
spot_img
spot_img

पिंजरा’चं पर्व संपलं! प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन; सिनेसृष्टी सूवर्णकाळाच्या साक्षीदाराला मुकली

एक नजर महाराष्ट्र न्यूज                              मुख्य संपादक भीमसेन जाधव                              मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन झाले आहे. वयाच्या 97व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांचा ‘पिंजरा’ हा सिनेमा तुफान गाजला होता. मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेला सिनेमा पिंजरामध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन झाले आहे. वयाच्या 97व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. काल संध्या यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून संध्या यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम या व्ही शांताराम यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्यांनी मराठीसह हिंदी सिनेमांमध्येही स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता त्यांच्या निधनाची बातमी समोर येत आहे. शनिवारी सकाळी साडे दहा वाजता परळ येथील राजकमल स्टूडिमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील वैकुंठधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलाने दिली निधनाची माहिती

 

व्ही शांताराम यांचा मुलगा किरण शांताराम यांनी संध्या यांच्या निधनाची माहिती दिली आहे. ‘गेल्या काही दिवसांपासून संध्या या आजारी होत्या. काल संध्याकाळी त्यांचे निधन झाले. आज सकाळी त्यांचे अंत्यसंस्कार झाले’ असे किरण शांताराम यांनी सांगितले. एक नजर महाराष्ट्र न्यूज कडून भावपूर्ण श्रद्धांजली

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या