एक नजर महाराष्ट्र न्यूज संपादक भीमसेन जाधव जनतेला आवाहन
बारामती :शहरातील रस्त्यावरून धडधडणारे अवजड डंपर / अवजड वाहनांमुळे वारंवार निष्पाप नागरिकांचे प्राण जात आहेत.
आज दि. 29/09/2025 रोजी फलटण चौक येथे घडलेल्या भीषण अपघातात मारुती उमाजी पारसे यांना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा प्रकार प्रशासनातील गंभीर निष्काळजीपणाचा आणि बेफिकिरीचा परिणाम आहे.
या विरोधात आज प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून,
उद्या दिनांक 30/09/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता विशाल मोर्चा व आंदोलन काढण्यात येणार आहे.
आमच्या मागण्या
1️⃣ बारामती शहरातील दिवसा डंपर वाहतूक कायमस्वरूपी बंद करावी.
2️⃣ जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
3️⃣ अशा अपघातग्रस्त कुटुंबियांना तातडीची मदत जाहीर करावी.
त्यामुळे सर्व बारामतीकर नागरिक, युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिकांनी या जनआंदोलनात सहभागी व्हावे,
आपला हक्क आणि जीविताच्या सुरक्षेसाठी एकजुटीने आवाज उठवावा
वेळ : सकाळी 10.00 वा.
ठिकाण :- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारका पासून उपविभागीय अधिकारी कार्यालय, बारामती
चला, जीव वाचवण्यासाठी आवाज उठवूया!
तुमचा सहभाग हेच आमचे बळ
आयोजक – समस्त बारामतीकर






