बारामती : वडगाव निंबाळकर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे निरा बारामती रस्त्यावर निंबूत गावच्या हद्दीत दिनांक 22/09/2025 रोजी रात्री 10/00 वाजता च्या दरम्यान एका संशयित मालवाहतूक चार चाकी गाडीला हात थांबवून पाहणी केली असता गाडी क्रमांक MH 11 DD 6926 मध्ये विनापरवाना बेकायदेशी देशी,विदेशी दारूचे बॉक्स मिळून आले.
गाडीत असणाऱ्या दोन इसमांना वाहतूक पास, परवाना,मुद्देमालाचे बील व इतर कागदपत्रांची व सदरचा मुद्देमाल कोठून आणला व कोठे घेऊन जात अहात याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात आल्याने पोलीसांनी मुद्देमाल व गाडी जप्त करून वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे येथे आणली व दोन्ही इसमांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला.
सदर गाडीतील इसमांची नावे शुभम रामचंद्र होळकर रा. रावडी खुर्द, तालुका फलटण, जिल्हा सातारा आणि दुसरा इसम सोमनाथ बाळासो पवार रा.करंजेपुल तालुका बारामती,जिल्हा पुणे अशी आहेत.
या कारवाई मध्ये मुद्देमाल व पिकअप गाडी सह एकूण 11,11,375/रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरील नमूद आरोपींच्या अटकेची कार्यवाही केली असून या गुन्ह्याचा अधिकचा तपास पोलीस हवालदार कुंडलिक कडवळे हे करीत आहेत.
सदरची कारवाई संदीपसिंह गिल्ल,पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, गणेश बिरादार,अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, सुदर्शन राठोड,उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक,नागनाथ पाटील,पोलीस हवालदार कुंडलिक कडवळे,पोलीस नाईक,भाऊसाहेब मारकड, अभिजीत जाधव,सूरज धोत्रे,विलास ओमासे व गृहरक्षक दलाचे जवान यांनी मिळून केली.