Monday, October 27, 2025
spot_img
spot_img

…तर खुर्ची खाली करा, दादांचा चिंतन शिबिरातून मंत्र्याना सज्जड दम, अजित पवार कशावरून संतापले?

एक नजर महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक.भीमसेन जाधव           ⭕राष्ट्रवादीचे मंत्री इतर कामात व्यस्त राहत असतील तर मंत्रीपद सोडावे लागेल ⭕ पालकमंत्र्यांना तीन दिवस मतदार संघामध्ये काढावे लागतील ⭕ चिंतन शिबीर केवळ आगामी निवडणुकीसाठी नाही पुढच्या पिढीसाठी आहेत ⭕ आपल्या मूल्यां सोबत तडजड होऊ नये याची सर्वांनी खबदारी घ्या, अजितदादांचा अहवाल ⭕ महाराष्ट्राला स्थिरता, प्रगती आणि ठोस निर्णयाची गरज ⭕ राष्ट्रवादी पक्षाला स्वतःची ओळख आणि विचारधारा आहे ⭕ राष्ट्रवादी पक्ष शिवरायांच्या मार्गावर चालणार – अजित दादा ⭕ आणि चुका होत असतील तर दुरुस्ती करा                                         अजित पवार यांनी महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांना एक कठोर इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, जिल्ह्यात फक्त तोंड दाखवण्यासाठी येणार हे चालणार नाही. मंत्र्यांनी त्यांच्या मतदारसंघात किमान तीन दिवस काम करावे आणि इतर कामांमध्ये व्यस्त असलेल्यांना आपले पद सोडावे लागेल. अजित पवार यांनी हे आवाहन एका चिंतन शिबिरात केले. त्यांनी महाराष्ट्राला स्थिरता, प्रगती आणि ठोस निर्णयाची गरज असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी पक्षाची स्वतःची ओळख आणि विचारधारा असून, तो शिवरायांच्या मार्गावर चालणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. पदाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात चुका झाल्यास त्या दूर कराव्या लागतील, अन्यथा पदाचा बळी द्यावा लागेल असा सल्लाही त्यांनी दिला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या