प्रबुद्ध नगरातील नागरिकांचा जीव धोक्यात!
मुख्य संपादक भीमसेन जाधव एक नजर महाराष्ट्र न्यूज बारामती प्रबुद्ध नगर येथील सार्वजनिक संडासातून सतत मैल्याचे पाणी बाहेर येत असून, परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कचरा, चिखल आणि दुर्गंधीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुले, शाळकरी विद्यार्थी, महिला आणि वृद्ध नागरिक यामध्ये आजारी पडण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
नगर परिषदेकडून स्वच्छ भारत अभियानाच्या घोषणा केल्या जातात, परंतु प्रत्यक्षात मात्र त्याची पायमल्ली होत आहे. अशा प्रकारची हलगर्जी केवळ नागरिकांच्या आरोग्याशी खेळ नाही तर हा कायद्यानुसार गुन्हाही आहे.
👉 आमच्या प्रमुख मागण्या :
1️⃣ संडासातील गळती व मैल्याचे पाणी तातडीने बंद करावे.
2️⃣ परिसराची संपूर्ण स्वच्छता करून जंतुनाशक फवारणी करावी.
3️⃣ नियमित स्वच्छतेसाठी जबाबदार कर्मचारी नेमावा.
4️⃣ संबंधित अधिकाऱ्यांवर हलगर्जीबद्दल कारवाई करावी.
जर तातडीने उपाययोजना केली नाही, तर आम्ही नागरिक आंदोलन छेडण्यास बाध्य राहू. ✊
📌 आपला विश्वासू,
मंगलदास तुकाराम निकाळजे
जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी
- पुणे जिल्हा (पुर्व)






