नांदेड जिल्ह्यातील “ऑनर किलिंग'” प्रकरणीचे बारामतीत पड़साद.. निर्गुण हत्या करणार्या आरोपींना कठोर शिक्षाकरण्यासाठी बहुजन समाजाच्या वतीने आंदोलन..
मुख्य संपादक एक नजर महाराष्ट्र न्यूज बारामती:- उमरी तालुका, जिल्हा नांदेड येथील बुरजुनी गावामध्ये दलित युवकाच्या प्रेमप्रकरणाचा राग डोक्यात घेऊन या प्रेमियुगलांना दोरीने बांधून गावात दिंड काढून विहिरीत ढकलून अमानुषपणे खून करण्याचा अत्यंत निर्दयी व घृणास्पद प्रकार घडला आसून या घटनेचेसोशल मीडियावर ही व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याने संपूर्ण दलित समाजात दहशतीचे वातावरण पसरल्यामुळे येथील समस्त बहुजन समाजातील क्रियाशील कार्यकर्ते पदाधिकारी,समाज बांधव यांनी एकत्र येत घटनेच्या निषेधार्थ भिगवण चौक या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी करून निषेध नोंदवला. सदर ठिकाणी महापुरुषांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या.
सदरलील घटनेचे कुठल्याही मीडियाने वार्ताकन केले नाही. तसेच राज्यातल्या एकाही जबाबदार नेत्यांनी व सरकारच्या प्रतिनिधीने सदरील ठिकाणी भेट दिली नाही, कुट्ंबाचेसांत्वन केले नाही असेही या निवेदनात म्हटले असून आपल्या देशात प्रत्येकाला इच्छा नुसारजीवन जगण्याचा तसेच जोडीदार निवडण्याचा अधिकार दिला आहे, सदर संविधानीक अधिकार पायदळी तुडवणाच्या या कृत्याचा तीव्र निषेध करण्याकरता व सदरील घटना केवळ एका जोडप्याच्या हत्यापुरती मर्यादित नसून मानवाधिकार आणि कायद्याचे उल्लंघन करणारी आहे अशा घटना समाजात पुन्हा घडू नये यासाठी कठोर कारवाई व्हावे या मागणी करता सदर आंदोलन करण्यात आले असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी काळुराम चौधरी, बिरजू मांढरे ऍंड सोमनाथ पाटोळे, केदार पाटोळे अनिकेत मोहिते, वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे. साधू बल्लाळ बापू शेंडगे,सौ आरतीताई शेंडगे-गव्हाळे, सुनील शिंदे. पप्पू भिसे, सुरज खंडाळे , ओमकार जाधव विशाल जाधव, शुभम अहिवळे, फैय्याजशेख, ऍँड करीन बागवान आदींनी मनोगत व्यक्त करून घटनेचा निषेध नोंदवून आरोपींनाकठोर शिक्षा करण्याची मागणी केली.
यावेळी , विजय खरात, पत्रकार किरण बोराडे. अभिजीत चव्हाण निलेश जाधव विजय तेलंगे लहुजी जाधव सचिन मांढरे कैलास सकट, विशाल खंडाळे अनिल लांडगे, विक्रम लांडगे, रत्प्रभाताई साबळे, पिंकी मोरे, अशोक कुचेकर,संजय भोसले, सुरेश अवघडे, राहुल गायकवाड, पप्पू खरात, सुरज शिंदे, किरण बोराडे,गणेश वायदंडे, अशोक खंडाळे यांच्यासह मोव्या संख्येने विविध पक्ष संघटना यांचेपदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनकर्त्याचा वतीने दिलेले निवेदन निवासी नायब तहसीलदार नामदेव काळे यांनी
या आंदोलनाचे नियोजन सोमनाथ पाटोळे केदार पाटोळे अनिकेत मोहिते किरण बोराडे , विजयजी खरात सुनील शिंदे, साधू बल्लाळ,, आदींनी केले.






