मुख्य संपादक भीमसेन जाधव एक नजर महाराष्ट्र न्युज बारामतीः मूळ मागास असलेल्या 14 विमुक्त व 28 भटक्या जमातींना महाराष्ट्र वगळता इतर राज्यात एससी/एसटीचा दर्जा असताना, महाराष्ट्रात अनुसूचित जमातीचा दर्जा मिळणेबाबत भारतीय टकारी समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.अविनाश वामनराव गायकवाड यांनी एकदिवशीय लाक्षणिक उपोषण करून समाजाच्या व्यथा शासनासमोर मांडल्या.
या जातींचा हैद्राबाद गॅझेट व ब्रिटीश दप्तरी जंगलातील व आदिवासी गुन्हेगार जमाती असल्याचे पुरावे आहेत. त्याचा अभ्यास करून शासनाने त्वरीत उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधिश यांची समिती नेमून हा अभ्यास करून कालबद्ध कालावधीत या 14 गुन्हेगार जमातींचा चौकशी अहवाल सादर करावा. या जमातींना अनुसूचित जमातीच्या 7 टक्के अधिक 3 टक्के असे 10 टक्के आरक्षण वाढवून आदिवासी सवलती प्रदान कराव्यात अशा मागण्यांचे निवेदन यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना बारामतीचे तहसिलदार यांचेद्वारे दिले आहे.
या एक दिवशीस लाक्षणिक उपोषणासाठी बारामती तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर टकारी, कैकाडी, रामोशी, वडार, पारधी इ. जमातीचे प्रमुख प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते. जय मल्हार क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष नानासाहेब मदने, बारामती शहराध्यक्ष सागर खोमणे, कैकाडी समाजाचे ॲड.धनाजी जाधव, शहाजी जाधव, वडार समाजाचे भारत पवार, सुभाष मोहिते, पारधी समाजाचे बापू पवार, सुक्षम काळे, टकारी समाजाचे अनिलअण्णा जाधव यांचेसह भारतीय टकारी समाज संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपोषणादरम्यान बहुजन समाज पार्टीचे काळुराम चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) शहराध्यक्ष बेलदार, राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प) गटाच्या महिला शहराध्यक्षा सौ.अनिता गायकवाड, माजी नगरसेविका आरती शेंडगे, सौ.सविता जाधव, चर्च ऑफ ख्राईस्टचे चेअरमन सुजित जाधव इ. भेट देऊन पाठींबा दिला.
उपोषणकर्ते ॲड.अविनाश गायकवाड बोलताना म्हणाले की, बारामतीतून विमुक्तांचा आवाज निर्माण करण्यासाठी विमुक्त जमातीने रणशिंग फुंकले आहे. राज्य सरकारने मागण्या मान्य न केल्यास या पिचलेल्या, दबलेल्या समाजातील घटकांना न्याय मिळेल अन्यथा या विमुक्त जमातींना घेऊन राज्यभर आंदोलने करून शासन दरबारी न्याय मिळविण्यासाठी आंदोलनाची तीव्रता वाढविणार असल्याचे सांगितले.
सदर उपोषण यशस्वी करण्यासाठी माजी पं.स.शिक्षण विस्तार अधिकारी संजय जाधव, अखिल भारतीय ओबीसी शहराध्यक्ष महेश गायकवाड, पु.जि.प्राथमिक शिक्षण संघाचे सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड, राजेश बापू जाधव, सतीश गायकवाड,किरण गायकवाड, राहुल जाधव, सयाजी गायकवाड, रितेश गायकवाड, प्रशांत जाधव, महेंद्र गायकवाड, वैष्णवी गायकवाड, दिनकर जाधव, लव गायकवाड,गौरव जाधव मिलिंद गायकवाड, नलेंद्र जाधव, निलेश गायकवाड,सुनिल गायकवाड गणेश गायकवाड, सुवर्णा गायकवाड इ. मोलाचे परिश्रम घेतले.






