Thursday, September 11, 2025
spot_img
spot_img

बारामतीत गौण खनिज माफियावरील कारवाईतून पुन्हा 31.24 लाख मिळवून दिले- मंगलदास निकाळजे

एक नजर महाराष्ट्र न्युज बारामती:  तालुक्यातील अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा बसावा यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी अवैध खनिज वाहतुकीत वापरालेल्या जाणाऱ्या वाहनांना स्वतःच्या पुढाकाराने धरून दिल्यामुळे शासनाकडे तब्बल ₹31.24 लाखांचा महसूल पुन्हा जमा झाला आहे.

 

खनिज माफियांना थेट धक्का देणारी ही कारवाई बारामती तालुक्यातील जनतेसाठी दिलासा देणारी ठरली आहे. अवैध उत्खननामुळे पर्यावरणाची हानी, शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान व शासन महसुलाची मोठी तूट होत असताना, निकाळजे यांनी दाखवलेले धैर्य आणि जनहितासाठी घेतलेली जोखीम कौतुकास्पद आहे. तसेच जी लोक रॉयल्टी भरत नव्हती ती लोक आज रॉयल्टी भरण्यासाठी रांगा लावत आहेत.

 

🔹 अवैध गौण खनिज वाहने पकडली

🔹 शासनाकडे तब्बल ₹31.24 लाख महसूल पुन्हा जमा

🔹 पर्यावरण व जनहिताचे रक्षण

 

मंगलदास निकाळजे यांच्या या धाडसी कारवाईमुळे प्रशासनाला देखील बळ मिळाले असून, समाजामध्ये “गौण खनिज माफियांवर आळा घालण्यासाठी आता कुणीतरी पुढे सरसावलं आहे” असा विश्वास निर्माण झाला आहे.

 

जनतेच्या हक्कासाठी, शासन महसुलाच्या रक्षणासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी सतत लढा देणारे मंगलदास निकाळजे यांचा हा उपक्रम बारामती तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे.

 

“जनतेचे नुकसान करणाऱ्यांना मोकळे सोडणार नाही” – ही त्यांची भूमिका आता अधिक ठळकपणे अधोरेखित झाली आहे

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या