एक नजर महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक भीमसेन जाधव संपर्क 91 12 13 16 16 बारामती: शहरातील गणेश भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले होते. दहा दिवसांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेल्या बारामती गणेश फेस्टिवलला आज (शनिवार) पारंपारिक विसर्जन मिरवणुकीच्या माध्यमातून उत्साही सांगता झाली.
सकाळी नेमक्या दहा वाजता तिरंगा सर्कल येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. भिगवण चौक मार्गे जात पुन्हा तिरंगा सर्कल येथे मिरवणुकीचा समारोप झाला. या मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांचा गजर, ढोल-ताशा पथकांची दणदणाट, लेझीम पथके, भजन, कीर्तन तसेच आकर्षक झांजपथक यांचा समावेश होता. महिला व युवकांचा उत्साही सहभाग उल्लेखनीय ठरला.
या भव्य सोहळ्यात बारामती गणेश फेस्टिवलचे अध्यक्ष किरण गुजर, तसेच नटराज नाट्य कला मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. सोहळ्याला बारामती नगरपरिषदेचे श्री. पंकज भुसे विशेष मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दहा दिवस चाललेल्या या उत्सवात विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांनी बारामतीकरांना समृद्ध असा सांस्कृतिक मेजवानीचा आनंद दिला. नृत्य-संगीत स्पर्धा, भजन संध्या, कीर्तन, सामाजिक जाणीव निर्माण करणारे उपक्रम, तसेच विविध कलागुणांचे सादरीकरण यामुळे गणेशोत्सव केवळ भक्तिमयच नव्हे तर सामाजिक उपक्रमांनीही समृद्ध झाला होता.
मिरवणुकीत गणेश भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले. “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषाने वातावरण दुमदुमले होते. पारंपारिक मिरवणुकीमुळे शहरात उत्साहाचे व भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
- बारामती गणेश फेस्टिवलची विसर्जन मिरवणूक केवळ धार्मिकतेपुरती मर्यादित न राहता सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐक्याचे प्रतीक ठरल्याचे समाधान आयोजक मंडळाने व्यक्त केले.