पुणे एक नजर महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक भीमसेन जाधव मो. 9112131616 पुणे : विक्रम प्रमाणपत्र प्रदान करताना
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, पुणे यांना वर्षभर सर्वाधिक भक्तसंख्येसाठी जागतिक मान्यता
यांच्याकडून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, पुणे, महाराष्ट्र यांना “वर्षभर सर्वाधिक भक्तसंख्या असलेल्या मंदिरासाठी जागतिक विक्रम” म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. भारताचे मुख्य कार्यकारी अधिकारी निहाल कांबळे, अभिनेत्री नितलराजे शितोळे सरकार व विश्वस्त अभय दादा भोर आदी मान्यवरांच्या हस्ते हे प्रमाणपत्र देण्यात आले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंदिर ट्रस्टला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सुवर्णयुग तरुण मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट यांनी हे सन्मान स्वीकारला. हा विक्रम मंदिरात वर्षभर सातत्याने होणाऱ्या भक्तांच्या दर्शनासाठीच्या गर्दीच्या आधारे प्रमाणित करण्यात आले
हे मंदिर भारतातच नव्हे तर जगभर प्रसिद्ध आहे. विविध देशांतील भक्त दरवर्षी मोठ्या संख्येने दर्शनासाठी येथे येतात. यामुळे हे मंदिर जगातील सर्वाधिक भेट दिले जाणारे आध्यात्मिक स्थळ ठरले आहे.