कुस्ती खेळणार नाही, मला नोकरीचीही गरज नाही, अशी भावना उद्वेगातून व्यक्त केल्यानंतर सर्वच स्तरातून डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरच्या पाठीवर धीराचा हात ठेवला जात आहे. मुंबई : डबल महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळविणारा पहिलवान हर्षवर्धन सदगीर याने नुकतीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी ‘कुस्ती सोडायची नाही, गुरु काकासाहेब पवार यांच्या तालमीत जायचं, असा सल्ला पवारांनी हर्षवर्धनला दिला. यावर हर्षवर्धन सदगीर यानेही सकारात्मक प्रतिसाद दिला. कुस्ती खेळणार नाही, मला नोकरीचीही गरज नाही, अशी भावना उद्वेगातून व्यक्त केल्यानंतर सर्वच स्तरातून हर्षवर्धनच्या पाठीवर धीराचा हात ठेवला जात आहे. शरद पवारांकडून १२ लाखांची मदत
कुस्ती सोडायची नाही, हा निर्धार अधिक बळकट झाला, कारण देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याला वरिष्ठ स्तरावरील सरावासाठी १२ लाख रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली, अशा भावना कुस्ती मल्लविद्या या इन्स्टाग्राम पेजवरुन व्यक्त करण्यात आल्या आहेत. ही मदत केवळ आर्थिक सहाय्य नसून, महाराष्ट्रातील पारंपरिक कुस्तीला मिळालेला मोठा प्रोत्साहनाचा हात आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी करण्यासाठी आवश्यक असलेला दर्जेदार सराव, आहार, फिटनेस आणि स्पर्धात्मक तयारी यासाठी ही रक्कम मोलाची ठरणार असल्याचंही यावेळी कुस्ती मल्लविद्याच्या अकाऊण्टवर म्हणण्यात आलं आहे. हर्षल सदगीर याच्या जिद्दीला आणि मेहनतीला मिळालेला हा सन्मान तरुण मल्लांसाठी प्रेरणादायी असून योग्य मार्गदर्शन, पाठबळ आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या जोरावर महाराष्ट्राची माती पुन्हा एकदा देश-विदेशात गाजेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. वाघोलीत किताब पटकावला
वाघोलीतील ६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दुहेरी किताब पटकावत हर्षवर्धन सदगीर याने दमदार कमबॅक केला. खेड्यातील कठीण परिस्थितीतून सुरु झालेला प्रवास आता आर्थिक अडचणी, नोकरीसाठीची धडपड आणि त्यातून पुन्हा उभं राहत जिंकलेलं यश या वाटेने ऑलिम्पिकच्या दिशेने झेपावत आहे. महेंद्र गायकवाडचा पराभव
हर्षवर्धनने फायनल सामन्यात त्याच्याच तालमीतील मल्ल महेंद्र गायकवाड याचा पराभव केला. दोघांपैकी कोणीही विजयी झालं असतं तरी चांदीचा गदा ही काका पवारांच्या तालमीत येणार होती. कारण हर्षवर्धन आणि महेंद्र हे दोघंही काका पवारांचे शिष्य आहेत. नाशिकच्या हर्षवर्धन याने कुस्ती जिंकत महाराष्ट्राचा सातवा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला आहे. तरी रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी एक नजर महाराष्ट्र न्यूज पहा






