तुम्ही पाहतात एक नजर महाराष्ट्र न्यूज बातमी तुमची नजर आमची मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेत या संदर्भात नवीन योजनेची घोषणा केली असून यामुळे महिला कर्मचाऱ्यांचा प्रवासातील त्रास कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. गर्दीच्या वेळी होणारी ओढाताण टाळण्यासाठी सरकारने ही पावले उचलली आहेत.
लवकर या लवकर जा योजना
राज्यातील सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी सरकारने लवकर या लवकर जा ही नवीन संकल्पना अंमलात आणली आहे. या योजनेनुसार आता महिला कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयाची वेळ सकाळी 9.15 वाजता सुरू होणार आहे. सकाळी कामावर येताना सार्वजनिक वाहतुकीमध्ये होणारी मोठी गर्दी आणि त्यामुळे महिलांना सहन करावा लागणारा त्रास लक्षात घेऊन ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे महिलांना वेळेवर कार्यालयात पोहोचणे आणि सायंकाळी लवकर घरी जाणे सोपे होणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केवळ कामाच्या वेळेतच बदल केला नाही तर महिलांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठीही मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्यातील महिला कर्मचाऱ्यांना आता 180 दिवसांची प्रसूती रजा मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला शक्ती कायदा लवकरात लवकर संमत व्हावा यासाठी शासन आग्रही असल्याची माहिती त्यांनी विधान परिषदेत दिली. याशिवाय अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय करण्याचे आश्वासनही सरकारने दिले आहे.






