Friday, March 27, 2026
spot_img
spot_img

महिलांनी स्वयंपूर्ण बनावे रंजनकुमार तावरे .

एक नजर महाराष्ट्र न्यूज                                       रंजनकुमार तावरे .

माळेगाव बुद्रुक, प्रतिनिधी ,महिलांनी जास्तीत जास्त स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वावलंबी बनावे असे उद्गगार माळेगाव कारखान्याचे माजी चेअरमन रंजनकुमार तावरे यांनी काढले, खांडज येथील सौ.आरती प्रशांत घोरपडे या नवोद्योजिका महिलेने उभा केलेल्या माळेगांव बुद्रुक येथील आरोही लेडीज शॉपीचे उद्घाटन सौ विजयाताई रंजनकुमार तावरे व रंजनकुमार शंकरराव तावरे यांच्या हस्ते संपन्न झाले .यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी माळेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुयोग शामराव सातपुते होते. यावेळी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रमोद मानसिंगराव जाधव ,माळेगाव नगरपंचायतचे गटनेते जयदीप दिलीपराव तावरे, माळेगाव नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा वृषाली राहुल तावरे ,माळेगाव नगरपंचायतीचे नगरसेवक जयदीप विलासराव तावरे, धैर्यशील मुरलीधर तावरे ,गौरव तुषार भुंजे , वैभव धर्मेंद्र खंडाळे , नगरसेविका चैताली निशिगंध तावरे,दिपाली अनिकेत बोबडे ,सोनाली संपतराव रासकर, प्रियंका रामचंद्र खरात, प्रांजली सचिन येळे ,साधना स्वरूप वाघमोडे , माळेगाव सोसायटीचे माजी चेअरमन निशिगंध विलासराव तावरे ,पोपटराव तावरे, मुरली खरात ,पप्पू खरात, रेहेमान शेख ,संपतराव कराडे, पोपटराव डोंबाळे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.तावरे पुढे म्हणाले ग्रामीण भागातून अनेक महीला सुशिक्षित व बेरोजगार आहेत.परंतू नोकरी मिळत नाही आणि व्यवसायाचे सखोल ज्ञान व मार्गदर्शन नसल्यामुळे मागे पडत आहेत. त्यामुळे आपल्यातील सूप्क्त कला गुण ओळखून व निर्भय बनून स्वतःचा व्यवसाय सुरू करावा व आपली स्वतःची आणि कुटुंबाची देखील प्रगती करावी असा मोलाचा सल्ला तावरे यांनी यावेळी दिला. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून नगराध्यक्ष सुयोग सातपुते यांनी महिलांनी जास्तीत जास्त एकत्रित येऊन महिला बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन स्वतःचे व्यवसाय सुरू करावेत . नोकरीच्या पाठीमागे न धावता स्वतःचा व्यवसाय सुरू करून नोकरी मागणाऱ्यांमध्ये न राहता नोकरी देणाऱ्यांमध्ये राहावे. असा मोलाचा सल्ला दिला. कु. भुमी संपतराव कराडे या तरुणीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे सक्षमीकरण व समाजातील असणारे महिलांचे महत्त्व विशद करत आम्ही तरुणी भविष्यात काहीतरी घडू शकतो असे प्रतिपादन केले. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य प्रमोद जाधव यांनी नवउद्योजकांसाठी लवकरच माळेगांव बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून कार्यशाळेचे आयोजन मार्गदर्शनपर शिबिरांचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगून जास्तीत जास्त नव उद्योजकांनी यामध्ये सहभाग दर्शवून आपला व्यवसाय चालू करण्याचे आव्हान केले.समित आदेश घोरपडे व वैभव विलासराव जाधव यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या