Thursday, March 26, 2026
spot_img
spot_img

बिग बॉस मराठी 6 मधून रुचिता जामदारचा प्रवास संपल्याची जोरदार चर्चा, विशाल पडणार एकटा

रोज पहा एक नजर महाराष्ट्र न्यूज                         बिग बॉस मराठी 6 मधून रुचिता जामदार एलिमिनेट झाल्याची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे                                         बिग बॉस मराठी सीजन 6 बाबत एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. बिग बॉस हा खेळ सुरू झाल्यापासून एक एक स्पर्धक एलिमिनेट होत गेले. पण प्रेक्षक सर्वाधिक वैतागलेले ते म्हणजे रुचिता जामदार हिच्या आवाजाला. बरेचदा प्रोमो किंवा बिग बॉसच्या इतर क्लिप मध्ये रुचिताला बाहेर काढण्याची मागणी व्हायची आणि आता अखेर या शोच्या 50 दिवसानंतर रुचिता जामदार बिग बॉस मधून एलिमिनेट झाल्याची चर्चा आहे.

बिग बॉस मराठी 6 मधून रुचिता जामदारचा प्रवास संपल्याची जोरदार चर्चा, विशाल पडणार एकटा

बिग बॉस मराठी 6 मधून रुचिता जामदार एलिमिनेट झाल्याची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू

 

बिग बॉस मराठी सीजन 6 बाबत एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. बिग बॉस हा खेळ सुरू झाल्यापासून एक एक स्पर्धक एलिमिनेट होत गेले. पण प्रेक्षक सर्वाधिक वैतागलेले ते म्हणजे रुचिता जामदार हिच्या आवाजाला. बरेचदा प्रोमो किंवा बिग बॉसच्या इतर क्लिप मध्ये रुचिताला बाहेर काढण्याची मागणी व्हायची आणि आता अखेर या शोच्या 50 दिवसानंतर रुचिता जामदार बिग बॉस मधून एलिमिनेट झाल्याची चर्चा आहे.

 

गेल्या संपूर्ण आठवड्यावर लक्ष घातले असता बहुतांश स्क्रीन टाईम हा विशाल आणि रुचिता यांनाच मिळालेला. वाइल्ड कार्ड सदस्यांची एन्ट्री झाल्यानंतर रुचिता थोडी अस्वस्थ वाटत होती. तिने काही दिवसांपूर्वीच विशाल वरील तिचे प्रेम व्यक्त केलेले. पण गेल्या आठवड्यात तिने त्याच्या खिशातूनच पावर की चोरली. त्यामुळे त्यांच्यात खटके उडताना दिसलेले. घरातील स्पर्धक सतत रुचिताला सतर्क करण्याचा प्रयत्न करत होते पण तरीही तिने विशालला साथ देण्याचे ठरवले.

वाईल्ड कार्ड नाही चाइल्ड कार्ड! पॉवर की च्या बेफिकीरपणामुळे रेवा आणि संस्कृतीला रितेश देशमुखचा सणसणीत टोमणा

 

परिणामी प्रेक्षकांच्या कौलानुसार रुचिताला तिचा प्रवास अर्धवटच सोडावा लागणार आहे असं दिसतंय. रुचिता ही टॉप 5 पैकी एक स्पर्धक मानली जात होती. स्ट्रॅटेजी, गेम प्लॅन्स या सगळ्यांमध्ये ती अव्वल होती परंतु घरात सतत आरडा ओरड करणे, इतरांच्या मुद्द्यांमध्ये घुसून आपला आवाज वाढवणे या गोष्टी प्रेक्षकांना नकोशा झालेल्या. दर भाऊच्या धक्क्याला रितेश देशमुख तिला सतत सतर्कतेचा इशारा देत होता परंतु तिच्या सुधारणा झाली नाही त्यामुळे शेवटी नको तेच झाले आणि रुचिताला बिग बॉस मराठीचा प्रवास अर्धवटत सोडावा लागत असल्याचे बोलले जाते.प्रयाच्या खोटारडेपणाला फसले सुभेदार, पुन्हा एकदा होणार अधीन, अर्जुनची आगपाखड पण सायलीने लावलं डोकं

 

रुचिता घराबाहेर पडल्यानंतर विशाल कोणासोबत जाणार? टोळी मधील सर्व सदस्य बाद झाल्यानंतर विशाल एकमेव सदस्य उरला आहे. तर गेल्या आठवड्यात संस्कृती साळुंखे, रेवा कौरासे आणि संकेत पाठक हे वाइल्ड कार्ड म्हणून सहभागी झाले आहेत. रुचिताच्या जाण्यानंतर विशालच्या टोळीमध्ये आता प्राजक्ता जाऊ शकते असे गेल्या काही एपिसोडवरुन अंदाज आहे.                        तुमची बातमी आमची नजर संपूर्ण महाराष्ट्रावर एक नजर महाराष्ट्र न्यूज

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या