Friday, March 27, 2026
spot_img
spot_img

‘अजितकाका.. तोपर्यंत मी बटण असंच उघडं ठेवणार’, रोहित पवार विधानसभेत ढसाढसा रडले अन्..

एक नजर महाराष्ट्र न्यूज वरती मोठी बातमी             मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (23 फेब्रुवारी) सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर शोक प्रस्ताव मांडण्यात आला. ज्यामध्ये सर्वच नेत्यांनी सभागृहात भाषण करत अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांना विधानसभेत भाषण करताना अजित पवारांच्या आठवणीने अक्षरश: रडू कोसळलं. पाहा यावेळी रोहित पवार नेमकं काय म्हणाले.

विधानसभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

‘मी आणि अजितदादा हे फार जवळचं नातं होतं. माझ्या जीवनात मला जिल्हा परिषदचे.. म्हणजे राजकारणातलं पहिलं तिकिट कोणी दिलं असेल तर ते अजितकाकांनी दिलं. आमदारकीचं तिकिट कोणी दिलं असेल तर ते माझ्या काकांनी मला तिथे दिलं. माझ्या परिवारामध्ये आमचे जे काका असतात ते पुतण्याचं लग्न ठरवतात. पवार साहेबांनी काकांचं ठरवलं. आणि माझ्या काकांनी माझं लग्न ठरवलं. ती गोष्ट मी कधी आयुष्यात विसरणार नाही.’

 

अजित पवार विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट, देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी दिली माहिती

‘माझे होणारे सासरे त्यांना भेटायला गेले होते आणि त्यांनी विचारलं होतं की, माझी मुलगी मी रोहितला देणार आहे तुमचं काय मत आहे? त्यावेळी त्यांनी एक सेकंद सुद्धा लावला नाही आणि म्हणाले की, होतकरू मुलगा आहे, कष्टाळू आणि व्हिजन घेऊ चालतो. लगेचच्या लगेच तिथे लग्न करून टाक आणि स्वत: आजारी असताना सुद्धा काका लग्नाला आले होते. तिथे त्या दिवशी त्यांच्या मुलाचंच लग्न आहे असं ते वावरत होते.’

 

‘VSR कंपनीला कोण वाचवतंय…’, रोहित पवारांनी ‘त्या’ केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा मागितला, मोदी-शाहांकडेही मोठी मागणी

‘पक्ष जेव्हा वेगळा झाला तेव्हा दादांकडून साहेबांबद्दल काही गोष्टी बोलल्या गेल्या असतील किंवा आम्ही बोललो गेलो असू.. पण काही दिवसांपूर्वी जेव्हा काका आणि आम्ही बारामती हॉस्पिटलला भेटलो होतो आम्ही तिथे सातत्याने चर्चा करत होतो. गेल्या काही महिन्यात दादांसोबत अगदी जवळून काम करण्याची संधी मिळाली होती.’

 

‘एक विकास लवांडे नावाचा कार्यकर्ता आहे. अजितदादांवर अतिशय जहाल पद्धतीने टीका केली होती जेव्हा त्यांनी पवार साहेबांना सोडलं होतं तेव्हा.. त्यावेळी विकास लवांडेंना दीड महिन्यांपूर्वी दादांना भेटवलं होतं. तेव्हा दादांनी सांगितलं की, मीच त्याला पक्षात आणलंय.. अहो दादा तुमच्या विरोधात तो बोलला म्हणून भेटायला घाबरतोय. तर म्हणाले की, अरे तू बोलला हे बरोबर पण मी सुद्धा बोललो होतो ना पहिलं दुसरं भाषण. त्यामुळे मी पण चुकलो, तू पण चुकलो.. पण आता आपल्याला.. एकत्र एका विचाराने काम करायचंय.. अशा मोठ्या मनाचे काका माझे होते.’    ‘मला ते म्हणायचे, रोहित तुझ्या झिपऱ्या वाढल्यात, जरा झिपऱ्या कमी कर.. त्या दिवशी एक आदरांजली म्हणून मी माझे केस कापले. ते मला म्हणायचे तुझं शारीरिक वजन वाढलंय.. जरा शारीरिक वजन कमी कर आणि राजकीय वजन वाढव. मी फक्त म्हणायचो.. हो करतो.. मी त्यांना शब्द देतो.. माझी हेअर स्टाइल मी अशीच ठेवीन.. शारीरिक वजन कमी करेन, राजकीय वाढवेल.’

‘पण एक गोष्ट खरीयं.. की, वरचं बटण वरपर्यंत लावत जा.. पण काकांना सांगायचंय, 40-50 वर्षानंतर मी तुम्हाला भेटेने, तोपर्यंत मी बटण असंच उघडं ठेवणार. त्यावेळेस मात्र, तुम्हाला भेटल्यानंतर हे बटण मी त्याठिकाणी लावेन. कारण शेवटी हे बटण आज उघडं ठेवल्यानंतर तुमची आठवण मला नक्कीच येईल. पण एक गोष्ट अजून आहे 40-50 वर्षांनी जेव्हा माझी आणि अजितकाकांची भेट होईल तेव्हा हा माझा जो आता मी लढत आहे आणि अख्खा महाराष्ट्र लढत आहे.. तेव्हा अजितकाकांसमोर ताठ मानेने मी उभा राहीन.’

असं म्हणत रोहित पवार यांनी आपल्या भाषणातून अजित पवारांविषयीच्या भावना व्यक्त केल्या.

अजित पवार विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट, देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी दिली माहिती

⭕रोज पहा एक नजर महाराष्ट्र न्युज   ⭕

बारामती प्लेन क्रॅश अन् ब्लॅक बॉक्सचे गूढ.., अशा विमान अपघातांचा खरा गुन्हेगार कोण असतो?

बारामती प्लेन क्रॅश अन् ब्लॅक बॉक्सचे गूढ.., अशा विमान अपघातांचा खरा गुन्हेगार कोण

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या