Wednesday, March 25, 2026
spot_img
spot_img

पुन्हा राज्यावर मोठं संकट, 7 जिल्ह्यांमध्ये थेट अलर्ट, अवकाळीचा कहर, पुढील 24 तास…

आजची सर्वात मोठी बातमी                            एक नजर महाराष्ट्र न्यूज वरती                            मुख्य संपादक भीमसेन जाधव  महाराष्ट्र:    राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच काही शहरांमधील प्रदूषण प्रचंड वाढले. हवा दिवसेंदिवस घातक होत चालली आहे. मुंबईमधील वायू प्रदूषण प्रचंड वाढलंय. कधी उन्हाळा, कधी थंडी तर मध्येच अवकाळी पाऊस अशी स्थिती राज्यात आहे. राज्यात काही दिवसांपूर्वीच मोठा पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे हाताशी आलेले शेतकऱ्यांचे सर्व पिक वाहून गेले. केंद्र शासनाकडून झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यात आली. फेब्रुवारी महिन्यात राज्यातून थंडी गायब झाली पण अजूनही पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाही. वर्षभर राहिल्या सारखा यंदा पाऊस राहिल्याचे दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होण्याचा आज अंदाज आहे. विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील इतरही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे                    भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात आज अवकाळी पाऊस हजेरी लावेल. यादरम्यान जोरदार वारेही सुटेल. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले.       नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. यासोबतच गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. निफाड येथे 11.6 सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मुंबईतील सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे 36.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.                          दुपारी उन्हाचा चटका बसत असतानाच आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज लावण्यात आला. अवकाळी पाऊस आल्यानंतर वातावरणात मोठे बदल होताना दिसत आहेत. शिवाय आज दिवसभर राज्यातील बहुतेक ठिकाणी सातत्याने तापमानात चढउतार हा बघायला मिळेल. देशातील इतर राज्यात जोरदार पाऊस होताना दिसत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या