आजची सर्वात मोठी बातमी एक नजर महाराष्ट्र न्यूज वरती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांना दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या घटनेची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आलं. मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमागचं कारण सुनील तटकरे यांनी सपष्ट केलं आहे. “आम्ही आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रमुल्ल पटेल, मंत्री हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अजित दादांचा जो अपघाती निधन झालं त्या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिलं. या संबंध प्रकाराची सीबीआयमार्फत चौकशी करावी, असं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वस्त केलं की, उद्या केंद्रीय गृह मंत्र्यांकडे राज्य सरकारकडून पत्र व्यवहार केला जाईल. ही सर्व चौकशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सीबीआयच्या माध्यमातून करु इच्छित आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडून पावलं उचली जाणार आहेत”, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली. सीबीआय तपास करेल तेव्हा आणखी व्यापक पद्धतीने तपास होऊ शकतो. ज्यावेळेला स्वायत्त यंत्रणा तपास करत असतात त्यावेळेला बाह्य देशातील सुद्धा तपास यंत्रणांची मदत होऊ शकत असते. त्यामुळे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सखोल पद्धतीने तपास व्हावा अशी मागणी आहे. या प्रकरणात जे मुद्दे उपस्थित होतात त्या मुद्द्यांसह तपास केला जावा आणि तपासाचा निष्कर्ष लवकराच लवकर देशाच्या जनतेसमोर आणावा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका होती. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि प्रदीर्घ चर्चा केली”, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिले






