Wednesday, March 25, 2026
spot_img
spot_img

Happy Valentine’s Day 2026 Wishes: साथ तुझी असू दे जन्मोजन्मी, व्हॅलेंटाइन डे 2026निमित्त पाठवा खास शुभेच्छा

आजची बातमी एक नजर महाराष्ट्र न्यूज कडून सर्वांसाठी                                                         बारामती :  व्हॅलेंटाइन डेनिमित्त तुमच्या मित्रमैत्रिणींसह प्रियजन आणि खास व्यक्तीलाही प्रेमाचे शुभेच्छा संदेश नक्की पाठवा.

डे म्हणजे प्रेम, जिव्हाळा आणि मनाच्या भावना व्यक्त करण्याचा सुंदर दिवस. प्रेमाची भावना शब्दांत मांडणं शक्य नाही. या खास दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला मनापासून शुभेच्छा देणे म्हणजे नात्याला आणखी गोडवा देणे होय. कधी कधी चार ओळींची कविता सुद्धा मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी पुरेशी ठरते. व्हॅलेंटाइन डेनिमित्त तुमच्या आवडत्या व्यक्तीला खास शुभेच्छा संदेश नक्की पाठवा.                             . तुझ्या प्रेमाचा गंध दरवळतो श्वासात

मन हरवून जाते तुझ्या मधुर हास्यात

जीवन फुलून येते तुझ्या सहवासात

व्हॅलेंटाइन दिनी वचन देऊया साथ आयुष्यभरात       तू आहेस म्हणून दिवस उजळतो

तुझ्या नावानेच प्रत्येक क्षण सजतो

हातात हात घेऊन स्वप्न रंगवू या

प्रेमदिनाच्या शुभेच्छा मनापासून तुला                    तुझ्या डोळ्यांत सापडली माझी दुनिया

तुझ्या हसण्यात उमलली माझे आनंद

साथ तुझी असू दे जन्मोजन्मी

प्रेमदिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये सखी                  गुलाबाच्या पाकळ्यांसारखं नातं आपलं

सुगंधी आणि नाजूक असं प्रेम आपलं

काळाच्या ओघात वाढत जावो गोडवा

हीच प्रेमदिनाची खास भावना                          रोज पहा एक नजर महाराष्ट्र न्यूज

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या